या पोलीस कर्मचाऱ्याने भीक मागणाऱ्या मुलांसाठी सुरू केली शाळा

जगात खूप कमी लोक असतात जी दुसऱ्यांचा विचार करतत. जे दुसऱ्यांसाठी काहीतरी करतात तेच खरे ‘हिरो’ असतात. असेच एक नाव आहे धर्मवीर जाखड यांचे. राजस्थान पोलिसात काम करणाऱ्या जाखड यांनी 2016 मध्ये बेघर मुलांसाठी शाळेची सुरूवात केली. आज त्यांच्या ‘अपनी पाठशाला’ शाळेत 450 लहान मुले शिक्षण घेत आहेत.

धर्मवीर जाखड यांनी चुरू जिल्हा मुख्यालयात महिला पोलीस स्टेशनच्या जवळच शाळेची स्थापना केली. रस्त्यावर मुलांना भीक मागताना बघून त्यांना त्यांच्यासाठी शाळा सुरू करण्याचा विचार आला. पोलीस स्टेशनच्या आजुबाजूला अनेक बेघर मुले राहतात.

सुरूवातीला त्यांना स्वतः मुलांना 1 तास शिकवण्यास सुरूवात केली. हळूहळू याचे रूपांतर शाळेत झाले. महिला कॉस्टेंबल आणि इतर समाजसेवकांनी देखील त्यांची मदत केली. त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या 200 मुलांचे त्यांनी सरकारी शाळेत अडमिशन केले. यातील 90 मुले सहावी ते आठवीच्या वर्गात शिकतात.

शाळेजवळ विद्यार्थ्यांना आणण्यासाठी स्वतःची व्हॅन देखील आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेचा युनिफॉर्म, बुट, जेवण आणि पुस्तके देखील दिली जातात.  विद्यार्थ्याना शाळेत आणणे हे सर्वात अवघड काम होते. काही मुलांना कचरा वेचण्यासाठी देखील सुट्टी देण्यात येते, कारण हे केले नाहीतर आई-वडिल शाळेत येऊ देत नाहीत. मात्र विद्यार्थी हे सर्व शाळा संपल्यावर करतात.

ही शाळा चालवण्यासाठी महिन्याला 1.5 लाख रूपये खर्च येतो. सर्वसाधारणपणे ही रक्कम डोनेशन आणि सोशल मीडिया कॅम्पेनद्वारे जमा होते. याशिवाय जाखड यांनी सांगितले की, सरकारकडून त्यांना काहीही मदत मिळत नाही. आज जाखड यांच्या प्रयत्नामुळे 450 बेघर मुलांना शिक्षण मिळत आहे.

Leave a Comment