नवज्योत सिंग सिद्धू यांना पुन्हा एकदा पाकिस्तानकडून बोलवणे


नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान दरम्यान जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर तणावाचे वातावरण आहे. त्यातच आता येत्या ९ नोव्हेंबरला पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन करणार आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना पाकिस्ताने या उद्घाटन समांरभासाठी आमंत्रण दिले आहे.

इम्रान खान यांच्या आदेशानंतर पाकिस्तानचे खासदार फैसल जावेद यांनी सिद्धू यांना फोनवरून उद्घाटन समांरभात सामिल होण्याचे आमंत्रण दिले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी यापुर्वी प्रमुख पाहूणे म्हणून भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आमंत्रन दिल्याचे सांगितले होते. आमंत्रण मनमोहन सिंग यांनी मान्य केले असून ते एक प्रमुख पाहुण्याच्या रुपात नाही. तर एका सामान्य माणूस म्हणून कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटन समांरभात येतील, असे कुरैशी यांनी सांगितले होते.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली होती. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची तिथे त्यांनी गळाभेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे फार मोठा गदारोळ माजला होता. भाजपसह इतर अनेक पक्षांनी सिद्धूवर टीका केली होती.

Leave a Comment