2024 पर्यंत 100 नवीन विमानतळे बनविण्याचा सरकारचा मानस

पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पुर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. केंद्र सरकार 2024 पर्यंत 100 नवीन विमानतळे बनविण्याचा विचार करत आहे. सरकारच्या प्रस्तावानुसार, एक हजार नवीन मार्ग सुरू करण्याचा देखील विचार करत आहे. हे नवीन मार्ग छोटी शहर आणि गावाला जोडतील.

मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत 2025 पर्यंतच्या गरजेच्या इंफ्रास्ट्रक्चरची समीक्षा करण्यात आली. या बैठकीत विमान भाडे फायनान्सिंग बिझनेस याविषयी देखील चर्चा करण्यात आली.

नवीन विमानतळांसोबतच दरवर्षी 600 पायलट्सना स्थानिक स्तरावर प्रशिक्षित करण्याचा प्रस्ताव देखील सादर करण्यात आला. याशिवाय 5 वर्षात विमानांच्या संख्येत वाढ करून ही संख्या 1200 पर्यंत नेण्याचा विचार आहे.

अर्थव्यवस्थेची गती मंदावली असल्याने इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सद्वारे याला गती देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.

 

 

Leave a Comment