… म्हणून या युट्यूबरने लावली तब्बल 2 कोटी झाडे

हवामान बदलाचा परिणाम होत आहे, पर्यावरण सुरक्षित नाही, झाडे तोडली जात आहेत. अशा तक्रारी आपण नेहमीच करत असतो. मात्र आपण स्वतः खूप कमी गोष्टी पर्यावरणासाठी करत असतो. ते म्हणतात ना, कोणताही बदल घडवायचा असेल, तर त्याची सुरूवात स्वतःपासून करायला हवी. असेच काहीसे 600 युट्यूबर्सनी केले आहे. त्या सर्वांनी मिळून तब्बल 2 कोटी झाडे लावली.

जिम्मी डॉन्ल्डसन नावाचा एक युट्यूबर मी. बिस्ट (MrBeast) नावाचा युट्यूब चॅनेल चालवतो. त्याच्या स्बस्क्रायबर्सची संख्या 2 कोटी झाली आहे. याच आनंदात त्याने 2 कोटी झाडे लावण्याचा निर्धार केला.

एवढी झाडे लावण्यासाठी त्याने सोशल मीडियावर कँम्पेन सुरू केले. आपल्या स्बस्क्रायबर्सना झाडे लावण्याचे आवाहन केले. त्यांच्याकडून डोनेशन देखील मागवले.

Arbor Day Foundation नावाची संस्था झाडे लावण्याची कामे करते. जिम्मी आणि इतर युट्यूबर्स या संस्थेशी जोडले गेले. या संस्थेला एक झाड लावण्यासाठी त्यांनी एक डॉलर देण्याचे त्यांनी ठरवले. डोनेशन लोकांकडून घेतले व संस्थेला दिले. एवढेच नाही तर युट्यूबची कमाई देखील त्याने संस्थेला दिली.

या कॅम्पेनसाठी एलॉन मस्क आणि ट्विटर फाउंडर जँक डोर्सी यांनी देखील डोनेशन दिले.

Leave a Comment