‘प्रदूषणासाठी भारत जबाबदार’, पाक मंत्र्याचा अजब दावा

आपल्या विचित्र विधानांमुळे सतत चर्चेत असलेले पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी पुन्हा एकदा आपल्या अजब विधानामुळे चर्चेत आले आहेत. यंदा त्यांनी लाहोरमधील वाढत्या प्रदुषणाला भारत जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी ट्विटरवर पर्यावरण मंत्र्याचा संदर्भ देत सांगितले की, लाहोरमधील प्रदुषणाचा स्तर हा भारतातील खराब पर्यावरण आणि शेतातील पेंढ्या जाळण्यात येत असल्याने वाढत आहे. लाहोरच्या तुलनेत वाघा बोर्डरवर प्रदुषण अधिक आहे. मोदी सरकार प्रत्येक गोष्टीत अपयशी ठरले आहे.

ट्विटर युजर्सनी मात्र फवाद चौधरी यांचे विधान हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. एका युजर्सने लिहिले की, प्रत्येक गोष्टीला भारताला जबाबदार धरण्यापेक्षा स्वतः त्याची जबाबदारी घ्या.

Leave a Comment