नवीन लूकमध्ये लाँच झाली ह्युंडाईची i20 एक्टिव

ह्युंडाईने आपली सर्वात लोकप्रिय कार ह्युंडाई आय20 एक्टिव नवीन अवतारात लाँच केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 7.74 लाख ते 9.93 लाख रूपयांपर्यंत आहे. कंपनीने एस, एसएक्स आणि एसएक्स ड्युल या तीन व्हेरिएंटमध्ये ही कार लाँच केली आहे.

ह्युंडाईने या कारमध्ये सरकारद्वारे निश्चित करण्यात आलेले सेफ्टी फीचर्स दिले आहेत. यामध्ये रिअर व्यू कॅमेऱ्यासोबत, रिव्हर्स पार्किंग सेसंर्स, स्पीड अलर्ट सिस्टम आणि ड्रायव्हर व पॅसेंजर सीट बेल्ट रिमायंडर सारखे फीचर्स दिले आहेत.

(Source)

स्टँडर्ड किटशिवाय या कारमध्ये नवीन कोणतेही फीचर्स देण्यात आलेले नाहीत. किंमतीविषयी सांगायचे तर, जुन्या आय20 च्या तुलनेत या कारची किंमत 2 हजार रूपयांनी जास्त आहे. यात कॅस्केडिंग ग्रिल आणि प्रोजेक्टर हँडलँम्पस देण्यात आले आहेत. कारच्या कॅबिनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. यामध्ये अँड्राईड ऑटो आणि अपल कार प्ले सपोर्ट 7 इंच इफोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे.

(Source)

नवीन आलेल्या आय20 मध्ये जुनेच 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.4 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोल इंजिनमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स मिळेल तर डिझेल इंजिनमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स मिळतील. कंपनीने कारमध्ये काही बदल केले असले तरी, BS-VI इंजिन यात देण्यात आलेले नाही. कंपनी बीएस-6 इंजिन असणारी आय20 एक्टिव 2020 मध्ये लाँच करेल.

Leave a Comment