केवळ हा समुदाय विना परवाना भारतात बाळगू शकतो शस्त्र

केंद्र सरकारने कर्नाटकमधील समुदाय कुर्गचे कोडवा यांना विना परवाना बंदूक, शॉटगन ठेवण्याची परवानगी दिली आहे. या समुदायाला ब्रिटिश काळापासून हत्यार ठेवण्याची परवानगी आहे. कोडवा समुदायाचे लोक ‘कालीपोढ’ उत्सवानिमित्त शस्त्रांची पुजा करतात. सरकारने त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.

हा समुदाय कर्नाटकमधील कुर्ग भागातील आहे. कोडावा हा एकमात्र देशातील समुदाय आहे, ज्याला विना परवाना शस्त्र बाळगण्याची परवानगी आहे. ही परवानगी 2029 पर्यंत देण्यात आलेली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोडवांना ही सूट ब्रिटिश काळापासून मिळत आहे. केंद्र सरकारने शस्त्र कायद्यानूसार नियमांमध्ये त्यांना सूट दिली आहे. या समुदायाने शस्त्रांचा वापर कोणतेही राष्ट्रविरोधी कृत्य अथवा गुन्हा करण्यासाठी केलेला नाही, त्यामुळे त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे.

 

Leave a Comment