कर्करोगाला कारणीभूत खाद्यपदार्थ


सध्या विविध सोशल मीडियावरून आहाराच्याबाबतीत अनेक सूचना करणार्‍या पोस्ट व्हायरल होत आहेत आणि त्यावरून अनेक प्रकारचे सल्ले दिले जात आहेत. त्यातल्या त्यात आपल्या शरीराला पोषणद्र्रव्ये पुरवणार्‍या खाद्य पदार्थांच्या बाबतीत खूप जागृती निर्माण होत आहे. परंतु असे पौष्टिक खाद्यपदार्थ खातानाच काही दक्षता घेण्याची गरज आहे. विशेषतः काही खाद्यपदार्थांमध्ये विशेषतः त्यांच्यावर प्रक्रिया करून उत्पादित केल्या जाणार्‍या खाद्यांमध्ये काही घातक द्रव्ये असल्यामुळे त्यांच्या सेवनातून कर्करोग बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारतज्ञ डॉक्टरमंडळी अशा खाद्यपदार्थांपासून दूर राहण्याची शिफारस करत आहेत. सोडा आणि कार्बोनेटेड शीतपेये ही आरोग्याला घातक असतात. त्यांच्यात साखर प्रचंड प्रमाणात असते.

प्रक्रिया केलेले मांस हेही अनेक रसायने घालून तयार केलेले असते. त्यात सोडियम नायट्रेट मिसळलेले असते. हे सोडियम नायट्रेट कर्करोगास कारणीभूत ठरते. मायक्रो पॉपकॉर्न हाही असाच खाद्यपदार्थ आहे. हे पॉपकॉन तयार करताना पीएफओए हे घातक रसायन मिसळलेले असते. या पॉपकॉर्नमुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होतो आणि किडनी, लिव्हर तसेच स्वादूपिंड यांच्यावरही घातक परिणाम होतो. बटाटा वेफर्स हे तर आपले नित्याचे खाणे. वेफर्स भरपूर खाण्याने वजन वाढते परंतु त्यांच्यामध्ये असलेले सोडियमचे जादा प्रमाण हे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. ज्या वेफर्समध्ये प्रिझर्व्हेटिव्ह, कृत्रिम रंग आणि स्वाद वापरलेला असतो ते वेफर्स तर आरोग्याला फारच घातक असते.

हे वेफर्स अती उच्च तापमानाला तळल्यामुळे त्यांच्यात ऍक्रिलॅमाईड हे कर्करोगास कारणीभूत ठरणारे रसायन तयार होत असते. त्याशिवाय आपण वनस्पती तुपाचा वापरही खाण्यासाठी करतो. त्याला हायड्रोजेनेटेड ऑईल असे म्हटले जाते. त्यामध्ये ओमेगा ६ हे फॅटी ऍसिड असते. ते आपल्या प्रकृतीस हानीकारक ठरते. सध्या आपल्या समाजात स्वतः धान्य आणून ते दळून आणून खाण्याची प्रथा बंड पडत आहे आणि बाजारातले तयार पीठे आणली जात आहेत. त्या पिठांवर त्यांचे पॅकिंग करण्यापूर्वी ज्या प्रक्र्रिया केल्या जातात. त्या प्रक्रियांमुळे काही रासायनिक द्रव्ये तयार होतात जी जाडी वाढण्यास कारणीभूत ठरतात. या सर्व पदार्थांच्या सोबतच गोठवलेले खाद्य पदार्थ आणि रिफाईंड शुगर हेही अनेक प्रकारच्या विकारांना बळ देतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment