फेसबुकने डिलीट केले अश्लिलता पसरवणारे दोन इमोजी


सध्याच्या घडीला आपला वावर हा डिजीटल युगात सुरु आहे. आजकाल जो तो सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असतो. त्यामुळे सध्या शब्द टाईप करण्याऐवजी चित्रमय संभाषणालाच अधिक महत्त्व दिले जात असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर किंवा मनात उमटलेल्या भावना चॅट करत असताना व्यक्त करण्यासाठी आपण शब्दांऐवजी आता इमोजीचा आधार घेतो. परंतु आता काहीशा मर्यादा या वापरावर येणार आहेत. कारण ‘वांगे’ आणि ‘पीच’ या दोन इमोजींवर बंदी घातली आहे. फेसबुक व इन्स्टाग्रामवर चॅट करताना या बंदीमुळे यापुढे आता आपल्याला या दोन इमोजींचा वापर करता येणार नाही.

‘वांगे’ आणि ‘पीच’ या दोन इमोजींचा वापर गेल्या काही काळात खुप मोठ्या प्रमाणावर केला जात होता. विशेषत: अश्लील संभाषण करण्यासाठी या इमोजींचा वापर केला जातो. फेसबुकने अश्लील संभाषण व संबंधित सामग्रीवर निर्बंध यावेत यासाठी या दोन इमोजींना काढून टाकले आहे. अशाच प्रकारच्या आणखी काही इमोजींना येत्या काळात काढून टाकण्यात येईल, असे स्पष्टीकरण फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग यांनी दिले आहे. अर्थात त्यांच्या या नव्या निर्णयावर फेसबुक वापरणारे नेटकरी फारसे खुश नाहीत.

गेल्या काही काळात सातत्याने फेसबुकच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आपली अकाऊंट हॅक झाल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या. तसेच फेसबुकचा विविध देशांच्या निवडणुकींमध्ये वापर चुकीच्या पद्धतीने केला जात असल्याचा आरोप फेसबुकवर केला गेला. फेसबुकने या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी व आपली सुरक्षा यंत्रणा आणखी प्रबळ करण्यासाठी आपल्या नियमावलीत काही तांत्रिक बदल केले. ‘वांगे’ आणि ‘पीच’ या दोन इमोजींना या बदलांमुळेच काढून टाकले असल्याचे मत सोशल मीडिया तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment