लहान मुलांसाठी घातक पेये


लोक आपल्या मुलांना कौतुकाने चित्रपटाला घेऊन जातात आणि चित्रपटाच्या मध्यंतरामध्ये पॉपकॉर्न आणि एखादे सॉफ्ट ड्रिंक असा प्रोग्रॅम ठरलेला असतो. काही काही पालक आपल्या मुलांना कोकाकोला, पेप्सीकोला, स्प्राईट, मिरिंडा अशी पेये मोठ्या कौतुकाने पाजतात. परंतु मुलांना कोणते पेय प्यायला द्यावे याचा फारसा विचार त्यांनी केलेला नसतो. परिणामी मुलांना दिल्या जाणार्‍या काही पेयांमुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असतात. पेप्सीकोला किंवा कोकाकोलासारखी किंवा तत्सम कार्बोनेटेड पेये तसेच सोडा यांच्यामुळे मुलांची जाडी वाढत असते आणि नकळतपणे त्यांची वाटचाल मधूमेह होण्याकडे होत असते. या पेयांमध्ये कसल्याच कॅलरीज नसतात आणि त्यांचे पोषणमूल्य शून्य असते. या पेयांचा रोगप्रतिकारक क्षमतेवर गंभीर परिणाम तर होतोच पण दातही खराब होतात.

मुले टी. व्ही.वर क्रिकेटचे सामने पाहतात. ते क्रिकेटचे खेळाडू मैदानावर उभे राहून आणि खेळून दमतात आणि त्यांना सतत तहान लागते. त्यांची तहान भागवण्यासाठी थंड पेयाची गाडी पॅव्हेलियनमधून सोडली जाते ती त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचते आणि खेळाडू ते पेय पितो. ते नेमके काय असते हे कोणालाच माहीत नाही. मात्र पेयाची गाडी नेणारा बॉय एक टी शर्ट घालत असतो आणि त्या टी शर्टवर एका पेयाची जाहिरात केलेली असते. त्या जाहिरातीमुळे मुलांना असे वाटते की तो खेळाडू तेच पेय पित असावा. अशा रितीने त्यांच्या मनावर परिणाम होतो आणि ही मुले त्याच पेयाची मागणी करतात. अशा प्रकाच्या पेयांमध्ये इलेक्ट्रोलाईटस् असतात आणि त्यामुळे ती उत्तेजक असतात असे मानले जाते.

असे असले तरी या पेयांमध्ये अनेक प्रकारचे अज्ञात घटक असतात आणि हे घटक मुलांच्या आरोग्यावर दूरगामी दुष्परिणाम घडवत असतात. विशेषतः डब्यामध्ये बंद असलेली पेये ही प्यायला बरी वाटतात परंतु त्यांच्यामध्ये साखरेचे प्रमाण अती असते. ते मुलांसाठी घातक ठरते. कच्चे दूध प्राशन करणे हेसुध्दा घातक असते. मात्र आपले पूर्वज कच्चे दूध पित होते त्यामुळे ते फार स्ट्रॉंग होते असा गैरसमज निर्माण केला जातो. तज्ञांचे मत असे आहे की मुलांची रोगप्रतिकारक क्षमता ही तुलनेने म्हणजे प्रौढांच्या तुलनेने फार कमी असते. ती पुरेसी विकसित झालेली नसते आणि ही क्षमता विशेष करून खाद्यातून आणि पेयातून मिळणार्‍या घटकांमुळे अधिक बाधित होत असते. त्यामुळे लहान मुलांच्या खाण्यापिण्याला फार सांभाळले पाहिजे. निंबूपाणी, उसाचा रस, ताक, आंब्याचे पन्हे, जलजिरा, मँगो लस्सी, आमरस, शहाळे, स्ट्रॉबेरी मिल्क शेक हे मुलांसाठी चांगले पर्याय आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment