5जी नेटवर्क सेवेचा चीनमध्ये शुभारंभ

चीन सरकारच्या तीन वायरलेस कंपन्यांनी चीनमध्ये सर्वात मोठे नेटवर्क 5जी ची सुरूवात केली आहे. अमेरिका-चीन ट्रेड वॉरमुळे गेल्या अनेक दिवसांपासून ही सेवा प्रलंबित होती. चीनमधील सर्वात मोठी कंपनी चायना मोबाईल लिमिटेडने बिजिंग, शांघाई आणि शेंनझेंन या शहरांसह 50 शहरात ही सेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी ग्राहकांना महिन्याला 18 डॉलर मोजावे लागतील. इतर कंपन्या चीन टेलिकॉम कॉर्पोरेशन आणि चीन युनिकॉम हाँगकाँग लिमिटेडने देखील कमी दरात आपली सेवा सुरू केली आहे.

चीनमध्ये ही सेवा पुढील वर्षी सुरू करण्यात येणार होती, मात्र ह्युएई कंपनीवर अमेरिकने प्रतिबंध घातल्याने ही सेवा याचवर्षी सुरू करण्यात आली. अमेरिकेत अनेक शहरांमध्ये ह्युएईचे पार्ट्स न वापरता 5 जी सेवा देण्यात येत आहे. याशिवाय दक्षिण कोरियाने देखील एप्रिलमध्ये ही सेवा सुरू केली आहे.

चीन हा व्यावसायिक दृष्टीने 5 जी नेटवर्कचा वापर करणारा जगातील सर्वात मोठा देश बनला आहे. 10 मिलियन पेक्षा अधिक युजर्सनी 5 जी नेटवर्कसाटी प्री-रजिस्ट्रेशन केले होते.

Leave a Comment