स्टिव्ह जॉब्स यांचा दुर्मिळ कॉम्प्युटर विक्रीसाठी उपलब्ध, किंमत कोटींच्या घरात

अमेरिकेची टेक कंपनी अ‍ॅपलचे संस्थापक स्टिव्ह जॉब्स आणि सह-संस्थापक स्टिव्ह वोजानिएक यांनी कॉम्प्युटर अ‍ॅपल 1 बनवला होता. आता हा दुर्मिळ कॉम्प्युटर ई-कॉमर्स वेबसाईट ईबेवर ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या दुर्मिळ कॉम्प्युटरची किंमत 1.75 मिलियन डॉलर (12.3 कोटी रूपये)  आहे. वुडन केसिंग असल्याने या डिव्हाईसची किंमत कोटींच्या घरात पोहचली आहे.

अ‍ॅपल 1कॉम्प्युटरच्या मालकानुसार, त्यांच्याकडे हे डिव्हाईस, 1978 पासून आहे. हा कॉम्प्युटर आताही वापरता येवू शकतो. अ‍ॅपल 1 च्या आधीचे कॉम्प्युटर्स देखील कोटी रूपयांमध्ये विकले गेले आहेत. 2016 मध्ये अ‍ॅपल 1 चे प्रोडक्शन व्हेरिएंट 8,15,000 डॉलर किंमतीत विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

स्टिव्ह जॉब्स यांनी या डिव्हाईसचे मॉनिटर आणि एक वुडेन केस तयार केले होते. ग्राहकांना या कॉम्प्युटरमध्ये ऑरिजनल ओनल मॅन्युअलची डिजिटल कॉपी, बेसिक मॅन्युअल, कॅसेट इंटरफेस, बेसिक गेम्स, लँग्वेज, लो अँन्ड हाय मेमरी टेस्ट यासारखे फीचर्स मिळतील.

कॉम्पुटर खरेदी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, विशेष बाइट शॉप KOA वुडन केस लावण्यात आलेले जगभरात असे केवळ सहा कॉम्प्युटरच आहेत. अ‍ॅपल 1 इतर डिव्हाईसच्या तुलनेत अधिक चांगले आहे.

अ‍ॅपल 1 कॉम्प्युटरला 11 एप्रिल 1976 मध्ये लाँच करण्यात आले होते. कंपनीने चांगल्या परफॉर्मेंससाठी 4 केबी मेमरी दिली होती, जी 48 केबींपर्यंत वाढवली जाऊ शकते. याशिवाय यात MOS 6501 सीपीयू सपोर्ट देखील आहे. अ‍ॅपल 2 बाजारात आल्यानंतर कंपनीने हे डिव्हाईस 30 सप्टेंबर 1977 ला बंद केले.

Leave a Comment