भाजप खासदाराला अॅमेझॉनने पाठवला मोबाईलच्या जागी दगड


ऑनलाईन शॉपिंग फ्लॅटफॉर्म सध्याच्या घडीला जसे खूप सोयीस्कर झाले आहे तसेच ते अवघड देखील झाले आहे. विशेष करुन फेस्टीव्हल सीझनमध्ये ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देत असतात. त्याचवेळी काहींची फसवणूक झाल्याचे देखील आपल्या ऐकण्यात येते. आता पर्यंत तुम्ही सर्वसामान्यांना चुना लागल्याच्या बातम्या ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. पण यावेळी एका खासदाराची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या खासदार महोदयांनी अॅमेझॉन या ई-कॉमर्स कपंनीकडून एक मोबाईल मागवला होता, पण या खासदार मोबाईलच्या जागी चक्क एक दगड पाठवण्यात आला आहे. आता बातमीचा आनंद जनता घेत आहे, त्याचबरोबर कुमार विश्वास यांनी देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पश्चिम बंगालमधील मालदा येथील भाजप खासदार खगेन मुर्मू यांना ऑनलाईन रेडमी 5 ए एक स्मार्टफोन ऑर्डर केला होता. ज्यावेळी या मोबाईलची डिलिव्हरी त्यांना करण्यात आली, तेव्हा बॉक्स तर रेडमी 5 एचा होता पण त्यात मोबाईलच्या जागी दोन मोठे दगड होते. त्यानंतर मुर्मू यांनी याची तक्रार पोलिसात दाखल केली. त्याचदरम्यान सोशल मीडियावर या घटनेची भनक लागली.


वृत्तसंस्था असलेल्या एएनआय या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली. या ट्विटवर नेटकऱ्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने अॅमेझॉन देखील बोलत आहे मंदिर तिथेच बनवणार, म्हणून दगड पाठवला आहे. तर दुसऱ्या युजरने खासदार महाशय आता कसे वाटत आहे असा प्रश्न विचारला आहे.


दरम्यान प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, अनुभवा खासदार महाशय, तुम्हाला निवडणुकीत विजयी करुन दिल्यानंतर सर्वसामान्य मतदारांना काय वाटत असेल.


पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारील मुर्मू यांना म्हटले आहे की हा फोन त्यांच्या मुलाने मागवला होता. ज्यावेळी याची डिलिव्हरी करण्यात आली त्यावेळी तो घरी नव्हता. त्यावेळी माझ्या पत्नीने मोबाईल घेतला आणि डिलिव्हरी बॉयला 11999/- रुपये रोख दिले. ज्यावेळी हा बॉक्स मुर्मू यांना उघडला त्यावेळी त्यांना आश्चर्यचा धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली.

Leave a Comment