करीना कपूर करणार मेलबर्नमध्ये टी-20 विश्वचषकाचे अनावरण


मेलबर्न येथे महिला आणि पुरुष टी -20 विश्वचषक स्पर्धा 2020च्या ट्रॉफी अनावरण बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान करणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये 18 ऑक्टोबरपासून आयसीसी पुरूष टी -20 विश्वचषक स्पर्धा 2020 सुरू होईल आणि 15 नोव्हेंबर रोजी समाप्त होईल. त्याचबरोबर, महिला टी -20 विश्वचषक देखील पुढील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये 21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान आयोजित केला जाणार आहे.

करिना कपूरने याबाबत माहिती देताना सांगितले की, या प्रतिष्ठित संध्याकाळचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. मला त्या सर्व स्वप्नांच्या पूर्तीसाठी देशाकडून खेळणार्‍या सर्व महिला खेळाडूंचा उत्साह वाढवायचा आहे, जे सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. यावेळी करिना कपूरने आपले दिवंगत सासरे नवाब मन्सूर अली खान पटौदी यांची आठवण करुन दिली की ते देशातील महान क्रिकेटपटूंपैकी एक होते आणि विश्वचषकाच्या ट्रॉफीचे अनावरण करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. करीना कपूर आता तिच्या आगामी ‘गुड न्यूज’ चित्रपटात अक्षय कुमारच्या सोबत दिसणार आहे, तर लवकरच ती आमिर खानसोबत लालसिंग चड्ढाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

यावेळी आयसीसी पुरूष टी -२० विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार असून 45 सामने खेळले जातील. महिला टी -20 विश्वचषक 2020 विषयी बोलायचे झाले तर ते ऑस्ट्रेलियामध्येच खेळवले जातील आणि यावेळी 10 संघ सहभागी होतील आणि एकूण 23 सामने खेळले जातील.

Leave a Comment