ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रिमिंग पर्यावरणासाठी धोकादायक

सध्या ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढत आहे. मात्र एका रिसर्चनुसार, या स्ट्रिमिंग सर्विसमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जेवढे कार्बन उत्सर्जन 6.27 किलोमीटर गाडी चालवल्यावर होते, तेवढे अर्धा तास चित्रपट बघितल्याने निर्माण होत आहे.

ऑनलाइन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर अर्धा तास चित्रपट पाहिल्यामुळे 1.6 किलो कार्बन डायोऑक्साइडचे उत्सर्जन होत आहे. फ्रांसच्या द शिफ्ट प्रोजेक्टच्या रिसर्चमध्ये ही माहिती समोर आली आहे.

मागील वर्षी ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रिमिंगद्वारे स्पेनएवढे कार्बनचे उत्सर्जन झाले. पुढील 6 वर्षात यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. यातील सर्वाधिक 34 टक्के ऑनलाईन ट्रॅफिक हे नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि हुलूवर आहे. पुढील सर्वोत मोठे सेक्टर हे पोर्न असू शकते.

रिपोर्टनुसार, डिजिटल व्हिडीओचा आकार हा अधिक मोठा असतो. त्यामुळे अधिक डाटासाठी अधिक वीज खर्च होते. याशिवाय स्क्रीनच्या आकारानुसार देखील व्हिडीओची साइज वाढते. त्यामुळे अधिक प्रमाणात वीजेचा वापर होतो.

 

Leave a Comment