ह्या स्मार्टफोनला असणारा 108 मेगापिक्सलचा कॅमेरा

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपला नवीन स्मार्टफोन एमआय नोट 10 लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनची खास गोष्ट म्हणजे यात 108 मेगापिक्सल कॅमेरा असून, यात 5 रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. कंपनी हा फोन 10 नोव्हेंबरला पोलंडमध्ये लाँच करणार आहे.

(Source)

याशिवाय कंपनी 5 नोव्हेंबरला चीनमध्ये एमआय सीसी9 प्रो लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये देखील 108 मेगापिक्सलचा प्रायमेरी कॅमेरा देण्यात आला आहे. यात देखील 5 रियर कॅमेरे आहेत. कंपनी हाच स्मार्टफोन एमआय नोट 10 नावाने 10 सप्टेंबरला पोलंडमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे.

5 सप्टेंबरला शाओमी एक नवीन स्मार्ट वॉट वॉच करणार आहे. कंपनीने याचा टीझर लाँच केला आहे. हे स्मार्टवॉच अॅपलच्या वॉचशी साम्य असणारे आहे.

(Source)

अ‍ॅपल वॉचप्रमाणेच शाओमी स्मार्ट वॉचमध्ये देखील रोटेटिंग बटन देण्यात आलेले आहे. ज्याला स्क्रोल करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामध्ये काळा आणि पांढऱ्या रंगाचे पर्याय मिळतील. यामध्ये 3डी कर्व्ड ग्लास देण्यात आला आहे.

शाओमी एमआय स्मार्ट वॉचला सेल्यूलर व्हर्जनमध्ये देखील लाँच करणार आहे. त्याद्वारे कॉलिंग देखील केले जाऊ शकते व वाय-फाय देखील कनेक्ट असेल.

Leave a Comment