स्मार्टफोन हॅकिंगबद्दल व्हॉट्सअ‍ॅपने या एजेंसीवर दाखल केला खटला

व्हॉट्सअ‍ॅपने मोबाईल स्पाय एजेंसी एनएसओ ग्रुपविरोधात फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे. ही एजेंसी इस्त्रायलची आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आरोप केला आहे की, एंजेसीने अनेकदा चुकीच्या पद्धतीने फोनला हॅक केले आहे.

काही दिवसांपुर्वीच व्हॉट्सअ‍ॅपच्या कॉलिंग सेवेत त्रुटी आढळली होती. कंपनीने म्हटले आहे की, यामागे एनएसओ ग्रुपचाच हात होता व याचा फायदा घेऊन एजेंसीने स्मार्टफोन हॅक केले. या हॅकिंगद्वारे हॅकर्स व्हिडीओ कॉलिंगद्वारे स्मार्टफोनमध्ये स्पायवेअर लोड करू शकतात.

ही त्रुटी शोधणाऱ्या सीटिझन लॅबने म्हटले आहे की, या प्रकारचे स्पायवेअर हल्ले पत्रकार आणि ह्युमन राइट्स ऐक्टिविट्सला टार्गेट करण्यासाठी केले जातात. या हल्ल्याचे नाव Pegasus होते व हे स्पायवेअर इस्त्रायलची कंपनी एनएसओ ग्रुपने तयार केले होते.

मात्र एनएसओ ग्रुपने म्हटले की, कंपनीचा यात थेट सहभाग नसून, कंपनी केवळ सरकारला माहिती पोहचवण्याचे काम करते. एनएसओ ग्रुपने या खटल्याच्या विरोधात लढणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment