या गिर्यारोहकाने 7 महिन्यात 14 शिखरांची चढाई करत रचला इतिहास

नेपाळचा गिर्यारोहक निर्मल पुर्जाने जगातील 14 सर्वात उंच शिखरे पार करून विक्रम तोडण्याचा दावा केला आहे. पुर्जाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकत दावा केला आहे की, त्याने मागील सात महिन्यांमध्ये 8000 मीटर (26,250 फूट) पेक्षा अधिक उंच 14 शिखरांची चढाई केली आहे.

याआधी पोलंडचा गिर्यारोहक जेरेज कुकुज्काने 1987 मध्ये 7 वर्ष 11 महिने आणि 14 दिवसात ही कामगिरी केली होती.तर त्या आधी इटलीच्या रेनहोल्ड मेसनरने देखील 14 शिखरे पार केली होती, मात्र त्याला अधिक वेळ लागला होता.

आपला विक्रम पुर्ण करण्याआधी निर्मलने अन्नपुर्णा, धौलागिरी, कांचनजंगा, एव्हरेस्ट, ल्होत्से आणि मकालू यांची चढाई केली होती. एक महिन्यानंतर आपल्या प्रोजेक्टमधील दुसरा भाग पुर्ण करण्यासाठी तो पाकिस्तानला गेले. तेथे त्याने 8,125 मीटर उंच नंगा पर्वत पार केला.

निर्मलने सप्टेंबरमध्ये हुए चो ओयू आणि मनासूल पर्वतावर चढाई केली. 35 वर्षीय निर्मलने एप्रिल महिन्यात ‘प्रोजेक्ट पॉसिबल’ची सुरूवात केली होती.

 

Leave a Comment