चमत्कारच ! कॅन्सरग्रस्ताकडे उपचारासाठी नव्हते पैसे, मात्र एका रात्रीत झाला कोट्याधीश

कॅन्सरचे नाव काढले की, अनेकांना भिती वाटते. या आजारावरील उपचारासाठी देखील लाखो रूपये लागतात. मात्र लोक जगण्याच्या आशेने जेवढे शक्य आहेत, तेवढा खर्च करत असतात. काही लोक आपल्या आयुष्याची कमाई या आजारातून बरे होण्यासाठी खर्च करतात, तर काही जण पैसे नसल्याने उपचार करणेच सोडून देतात. मात्र अमेरिकेत अशी घटनी घडली आहे जी, चमत्कारापेक्षा कमी नाही.

(Source)

अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना येथे राहणाऱ्या रॉनी फोस्टरला कॅन्सरच्या उपचारामुळे बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत होता. रॉनीला पोटाचा कॅन्सर आहे. ज्यासाठी त्याला कीमो थेरेपी करायची होती. मात्र पैसे नसल्याने उपचार करणे अशक्य होते. जेवढे शक्य आहे तेवढे पैसे रॉनी उपचारासाठी खर्च करत होते. विम्याची रक्कम देखील यासाठी कमी पडत होती.

(Source)

मात्र नशीब काय असते बघाच. रॉनी एक दिवस फिरत असताना बेउलिवले शहरातील एका स्टोरमध्ये थांबला. त्याने तेथे विन इट ऑल स्क्रॅच ऑफ तिकीट लॉटरी खरेदी केली. एक डॉलरच्या लॉटरीद्वारे रॉनीने 5 डॉलर जिंकले. त्यानंतर त्याने आणखी दोन लॉटरी खरेदी केली.

(Source)

रॉनीला पहिल्या लॉटरीमध्ये काहीच मिळाले नाही. मात्र दुसऱ्या लॉटरीमध्ये अनेक शून्य होते. ही गोष्ट रॉनीने काउंटर क्लार्कला दाखवल्यावर त्याने खूप मोठी रक्कम जिंकल्याचे सांगितले. रॉनी लॉटरी मुख्यालयात गेल्यावर तेथे त्याने 2 लाख डॉलरची लॉटरी जिंकल्याचे सांगण्यात आले. सर्व प्रकारच्या कर कापल्यानंतर रॉनीला तब्बल 1 लाख 41 हजार 502 डॉलर (जवळपास 1 कोटी रूपये) मिळाले.

(Source)

रॉनी परिवहन विभागात सेवानिवृत्त कर्मचारी आहे. रॉनीने सांगितले की, आता या पैशांचा वापर कॅन्सरच्या उपचारासाठी करणार आहे.

 

Leave a Comment