युरोपियन खासदार काश्मिर परिस्थितीवर संतुष्ट, म्हणाले…

काश्मिरमधील कलम 370 हटवल्यानंतर युरोपियन युनियनच्या 23 खासदारांचे प्रतिनिधीमंडळ दोन दिवसांच्या काश्मिर दौऱ्यावर आहे. या प्रतिनिधीमंडळाने पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी एक खासदार म्हणाले की, आम्ही येथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. दहशतवाद्यांमुळे नुकसान झालेल्या काश्मिरची स्थिती पाहण्यासाठी आलो आहोत. येथील लोकांना विकास आणि चांगली हॉस्पिटल्स हवी आहेत. काही लोक आम्हाला नाझीवादी म्हणत आहेत, मात्र आम्ही जर असे असतो तर लोकांनी आम्हाला निवडून दिले नसते.

प्रतिनिधीमंडळाच्या काश्मिर दौऱ्याआधी एमआयएमआयएमचे प्रमुख औवेसी म्हणाले होते की, या खासदारांना पाठवयाला नको होते, कारण हे नाझीवादी आहेत.

ब्रिटनचे खासदार म्हणाले की, 370 हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे. यामध्ये आम्ही कोणताही हस्तक्षेप करत नाही. आम्ही याआधी देखील भारत आणि पाकिस्तानमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. येथे आम्ही अनेक लोकांशी संवाद साधला. येथे विकास होत आहे, भारतातील प्रेसचे स्वातंत्र्य चांगली बाब आहे. लोकांनी आम्हाला निवडले आहे. आम्ही नाझीवादी नाही.

एक अन्य सदस्य म्हणाले की, काश्मिरमधील सुधारणांसाठी सरकार जी पावले उचलत आहेत, ती नक्कीच फायदेशीर आहेत. आम्ही युरोपात जाऊन देखील या गोष्टी सांगू. आम्ही युरोपातील लोकांना काश्मिरमध्ये फिरायला जाण्यास नक्की सांगू.

युरोपियन युनियन खासदारांच्या काश्मिर दौऱ्यावर काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी देखील टीका केली होती. त्यांनी ट्विट केले होते की, भारतीय खासदारांना काश्मिर यात्रेवर गेल्यावर पकडण्यात येत आहे व श्रीनगरवरून परत पाठवण्यात येते. मात्र युरोपियन खासदारांसाठी खास सोय केली जात आहे.

युरोपियन युनियन प्रतिनिधीमंडळात 8 देशांचे खासदार होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची देखील भेट घेतली.

Leave a Comment