ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये तिसऱ्यांदा दिली हॅलोविन पार्टी

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये तिसऱ्यांदा हॅलोविन पार्टी साजरी केला. यावेळी सैनिकी कुटूंबातील मुलांबरोबरच स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी लहान मुले डायनॉसोर आणि विविध प्राण्याच्या वेषात पोहचले होते. व्हॉइट हाउसमध्ये यंदाची हॅलोविनची थीम ‘भूताचे जंगल’ ही होती.

(Source)

थीमनुसार, व्हाइट हाउसच्या साउथ पोर्टिकोच्या खाबांवर काळ्या रंगाच्या झाडांचे मोठे कटआउट लावण्यात आले होते. ही झाडे भितीदायक होती व यांच्यावर पाने देखील नव्हती.झाडांच्या आजुबाजूला नांरगी रंगाचा प्रकाश पसरला होता. याशिवाय आजुबाजूला नारंगी रंगाचे भोपळे देखील ठेवण्यात आले होते.

(Source)

या वेळी हॅलोविन पार्टीमध्ये घोस्टबस्टर्स, बिविच्ड आणि हॅरी पॉटर्सच्या चित्रपटातील गाणी वाजवली. तर ट्रम्प आणि मेलोनिया यांच्या वॉक-आउटचे गाणे द एडम्स फॅमिलीमधील होते. यावेळी दोघांनी देखील आलेल्या मुलांबरोबर फोटो काढले व त्यांच्याबरोबर उत्साहात हॅलोविन पार्टी साजरी केली.

Leave a Comment