वैज्ञानिकांनी शोधला व्हेल शार्कच्या तोंडामध्ये राहणारा जीव - Majha Paper

वैज्ञानिकांनी शोधला व्हेल शार्कच्या तोंडामध्ये राहणारा जीव

जापानी वैज्ञानिकांनी व्हेल शार्कच्या तोंडात झींग्या सारख्या दिसणाऱ्या 5 मिलीमीटर आकाराच्या एका छोट्या जीवाचा शोध लावला आहे. गॅमरिडिया प्रजातीचा हा जीव व्हेल शार्कच्या तोंडात देखील जिंवत असतो. या प्रजातींच्या जीवांमध्ये उंच पर्वतांपासून ते खोल समुद्रातील वातावरणामध्ये राहण्याची क्षमता असते. या छोट्याशा जीवाला ‘पोडोसेरस जिंबे’ असे नाव देण्यात आले आहे.

(Source)

हिरोशिमा युनिवर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर आणि या शोधाचे नेतृत्व करणारे तोमिकावा यांच्यानुसार, हा तपकिरी रंगाचा प्राणी अन्य ठिकाणी 3 ते 5 सेंटीमीटरच्या लांबीमध्ये आढळतो. याच्या पायावर छोटे छोटे केस असतात.

वैज्ञानिकांनुसार, समुद्रातील जीवांना ताजे समुद्रातील पाणी, जेवण आणि सुरक्षा हवी असते. याच कारणामुळे या जीवाने व्हेल शार्कच्या तोंडाची निवड केली असेल. व्हेल शार्कच्या तोंडात या सर्व गोष्टी सहज मिळतात.

 

Leave a Comment