नोव्हेंबरमध्ये फिरायला जायच आहे ? या 12 ठिकाणांना नक्की भेट द्या

काम आणि जबाबदाऱ्यांमुळे प्रत्येकाचे आयुष्य व्यस्त झाले आहे. कामामुळे कुटूंबाबरोबर, मित्रपरिवारांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे अशावेळी मित्रांबरोबर, कुटूंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी तुम्ही एक छोटीशी ट्रिप प्लॅन करू शकता.

जर तुम्ही कोणती ट्रिप प्लॅन करण्याचा विचार करत असाल तर या नोव्हेंबर महिन्यात या जागेवर नक्की जाऊ शकता.

 

(Source)

उज्जैन, मध्य प्रदेश –

उज्जैन हे भक्ती आणि प्रेमाचे शहर आहे. येथे शिप्रा नदीसोबतच महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि अनेक मंदिर फिरू शकता. मंदिरात गणेश मंदिर आणि हरसिद्धी मंदिर प्रसिध्द आहे.  उज्जैनमध्ये कुंभ मेळ्याचे देखील आयोजन करण्यात येते.

(Source)

वर्कला, केरळ –

नोव्हेंरमध्ये फिरण्यासाठी सर्वात्तम ठिकाणांपैकी एक ठिकाण हे वर्कला आहे. येथे वर्कला बीच, शिवगिरी मठ, थिरूवमबाडी बीच, जनार्दन स्वामी मंदिर, विष्णू मंदिर आणि अंजेंगो फोर्ट फिरण्यासाठी चांगले ठिकाण आहे. याशिवाय सर्फिंग आण केळीच्या पानावरच्या जेवणाचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता.

(Source)

सांची, मध्य प्रदेश –

सांची हे जगभरातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठिकाण आहे. येथील कारागिरी आणि कथा या इतिहास आहेत. येथे द ग्रेट स्तूप, अशोक स्तंभ, उदयगिरी गुफा, गुप्त मंदिर आणि सांची संग्रहालय प्रसिध्द पर्यटक स्थळ आहेत.

(Source)

वायनाड, केरळ –

जंगल, वाइड लाइफ आणि पर्वतांनी सजलेले केरळमधील वायनाड सुंदर हिल स्टेशन आहे. येथे चेंबरा पीक, एडक्कल गुफा, वायनाड वन्यजीव अभ्यारण्य, सुल्तान बाथरी, थिरुनेली मंदिर, अंबुकुथी माला आणि कुरुवद्वीप या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेऊ शकता. याशिवाय, बर्डवॉचिंग, मंदिर यात्रा, कॉफीच्या बागा याचाही आनंद घेऊ शकता.

(Source)

हम्पी, कर्नाटक –

युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेले हम्पी नोव्हेंबरमध्ये फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे होणाऱ्या तीन दिवसीय हम्पी फेस्टिवलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशी येतात. येथे पुरात्त्व संग्रहालय, विजया विठ्ठल मंदिर, बंदर मंदिर (हनुमान मंदिर), राणी स्नान, शाही सलंग्न, हम्पी बाजार या ठिकाणी जावू शकता.

(Source)

दिल्ली –

दिल्लीमध्ये होणाऱ्या तीन दिवसीय वार्षिक कुतूब महोत्सव आकर्षणाचे केंद्र आहे. कुतूब मिनार येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथे हुमायूंचा मकबरा, कुतूब मीनार, अक्षरधाम मंदिर, लाल किल्ला, इंडिया गेट, कमल मंदिर, चांदनी चौक आणि बंगला साहिब गुरुद्वारा फिरू शकता.

(Source)

कुर्ग, कर्नाटक –

भारताचा स्कॉटलँड म्हणून ओळखले जाणारे कुर्ग हिवाळ्यात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे नामद्रोलिंग मठ, डबरे हाथी कॅम्प, अब्बी फॉल्स, इरुप्पु फॉल्स, मंडलपट्टी, ब्रह्मगिरी चोटी, राजाची सीट, नागरहोल पार्क आणि मल्लीली फॉल्स फिरू शकता. याशिवाय कॅम्पिग, रिव्हर  राफ्टिंग, जीप सफारी, हायकिंग, ट्रेकिंग, क्वाड बायकिंग आणि आयुर्वेदिक मसाजचा आनंद घेऊ शकता.

(Source)

अमृतसर, पंजाब –

नोव्हेंबरमध्ये गुरू नानक गुरपुरबच्या निमित्ताने स्वर्ण मंदिर आणि परिसर रोषणाई आणि फुलांनी सजलेला असतो. येथे स्वर्ण मंदिर, जलियनवाला बाग, अकाल तख्त आणि महाराजा रणजीत सिंह यांचा महाल फिरण्यासाठी चांगले ठिकाण आहे.

(source)

भरतपूर, राजस्थान –

भरतपूर हे 18 व्या शतकातील महालांसाठी प्रसिध्द आहे. याला लोहागढ किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. येथील केवलादेव राष्ट्रीय उद्यान देखील लोकप्रिय आहे.

(Source)

अल्मोंडा, उत्तराखंड –

हिमालयाच्या कुशीत कश्यप पर्वातरांगामध्ये 5 किमी परिसरात पसरलेले छोटेसे हिल स्टेशन अल्मोंडा आपल्या सुंदरतेमुळे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. येथील कासर देवी मंदिर, कटारमल सुर्य मंदिर, बिनसर वन्यजीव अभ्यारण्य प्रसिध्द आहेत. याशिवाय वॉकिंग, ट्रेकिंग, सन सेट आणि सन राइजचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता.

(Source)

सुंदरबन, पश्चिम बंगाल –

बंगालची शान आणि युनेस्कोचा जागतिक वारसा असणारे सुंदरबन पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. येथे वाघांची संख्या मोठी आहे. येथे तुम्ही बोटिंग देखील करू शकता. याशिवाय फोटोग्राफीसाठी देखील हे चांगले ठिकाण आहे.

(Source)

बूंदी, राजस्थान –

अरावली पर्वत आणि झऱ्यांच्या मध्ये बूंदी हे छोटेसे ठिकाण प्रसिध्द आहे.  येथे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बूंदी महोत्सवात हजारो लोक येतात. येथील गढ पॅलेस, तारागढ पॅलेस, नवल सागर झऱ्याला तुम्ही भेट देऊ शकता.

Leave a Comment