वणव्यामुळे हॉलिवूड स्टार्सना मध्यरात्री सोडावे लागले घर

उत्तर कॅलिफोर्नियामधील जंगलांमध्ये पसरलेल्या आगीने भीषण रूप धारण केले आहे. या वणव्यामुळे लॉस एंजिल्समधील तब्बल 5 मिलियन डॉलर्सच्या घरांचे नुकसान झाले असून, तेथे राहणाऱ्या सेलिब्रेटींना रातोरात घर सोडावे लागले आहे.

लॉस एंजिल्स येथील ब्रेन्टवूड हा भाग अनेक स्टार खेळाडू, हॉलिवूड स्टार्स, प्रोड्यूसर्स आणि मोठ्या उद्योगपतींच्या राहण्याचे ठिकाण आहे. लॉस एंजिल्समधील हा सर्वात श्रींमत भाग समजला जातो. मात्र वणव्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या सेलिब्रेटिंना मध्यरात्रीच घर सोडावे लागले आहे.

या ठिकाणी राहत असलेला प्रसिध्द बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्सला देखील वणव्यामुळे आपल्या कुटूंबाबरोबर घर सोडावे लागले. राहण्यासाठी घर शोधत असल्याची माहिती त्याने सकाळी 4 वाजता ट्विट करून दिली. जेम्सने 2017 मध्ये 23 मिलियन डॉलर्सचे घर ब्रेन्टवूड या भागात खरेदी केले होते. आगीमुळे सर्व भागात धूर पसरला आहे.

याशिवाय अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे माजी गव्हर्नर अर्नोल्ड श्वार्झनेगर यांना देखील हजारो लोकांबरोबर त्या ठिकाणावरून हलवण्यात आले,

याशिवाय ब्रेन्टवूड या ठिकाणी 1994 मध्ये माजी फुटबॉल स्टार ओ.जे. सिम्पसॉनवर आपल्या बायकोचा आणि वेटरची हत्या केल्याचा आरोप होता. यामुळे ब्रेन्टवूड हे लोकप्रिय ठिकाण आहे.

 

Leave a Comment