जाणून घ्या चविष्ट ‘कबाब’च्या इतिहासाबद्दल

कबाबचे नाव काढताच याची आवड असणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. टुंडे कबाब, हरियाली कबाब, पत्थर कबाब, शामी कबाब असेच कितीतरी प्रकारचे कबाब आपल्या येथे बनविले जातात. केवळ भारतातच नाहीतर जगभरात कबाब लोकप्रिय आहे. आज कबाबच्या इतिसाहाबद्दल जाणून घेऊया.

मोरक्कोचा प्रसिध्द प्रवाशी इब्र बतूता यांच्यानुसार, इसवी 1200 पासूनच कबाब भारतीय जेवणाचा भाग आहे. मात्र याचा शोध भारतात लागलेला नसून, याचा शोध तुर्कीमध्ये लागला आहे.

(Source)

तुर्कीमध्ये कबाबला ‘कबूबा’ म्हटले जाते. याचा अर्थ असे मांस ज्याला पाण्याशिवाय शिजवले जाते. मात्र भारत व इतर देशांमध्ये याला कबाबच म्हटले जाते. सांगण्यात येते की, तुर्की सैनिक प्रवासा दरम्यान मांस सांभाळून ठेवण्यासाठी आपल्या तलवारीवर मांस भाजून त्याला अनेक प्रकारचे मसाले लावून ठेवत असे.

याचा उल्लेख 1377 मध्ये लिहिण्यात आलेले तुर्की पुस्तक Kyssa-i Yusuf  मध्ये मिळतो. या ठिकाणी पहिल्यांदाच कबाबचा उल्लेख आलेला दिसतो. त्यानंतर कबाब संपुर्ण जगभरात पसरले.

(Source)

चंगेज खानला देखील कबाब खाणे आवडत असे. इतिहासकारांनुसार, जेव्हा तो आपल्या सैन्याबरोबर युध्दावर जात असे, तेव्हा त्याच्या पत्नी सैनिकांना मांस, कांदा, तांदूळ आणि मसाले बांधून देत असे. युध्दाच्या मैदानात अथवा आराम करताना ते देखील तुर्की सैनिकांप्रमाणेच तलवारीवर मांस भाजून खात असे.

16 व्या शतकात मुमताज महलचा मुलगा औरंगजेबने गोलकुंडा किल्ल्यावर विजय मिळवल्यानंतर सैनिकांसाठी कबाब बनविले होते. मात्र यांना तलवारींवर भाजून नाही तर तेथे आढळणाऱ्या ग्रेनाइड दगडांवर मांस भाजण्यात आले होते. याप्रकारे कबाब आपल्या जेवणातील एक आवडता पदार्थ झाला.

(Source)

आता कबाब केवळ मांसापासून नाही तर भाज्या आणि पनीरपासून देखील बनविण्यात येतो. यामध्ये हरियाली कबाब, पनीर टिक्का, दही कबाब याचा समावेश आहे. कबाबच्या या व्हेजिटेरियन व्हेरियाटीचा शोध भारतातच लागला आहे.

Leave a Comment