ट्रम्प यांच्या ‘बगदादी’ आणि ओबामांच्या ‘लादेन’ ऑपरेशनमध्ये हा आहे फरक

जगातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा मोहरक्या अबू बकर अल बगदादीला ठार करणे हा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बगदादीला ‘एखाद्या कुत्र्यासारखे बगदादीला मरण आले’ असे ट्विट केले.

मात्र बगदादीला मारण्याची माहिती देण्याची पध्दत ही अमेरिकेचे माजी राष्ट्रपती ओबामा यांच्या कार्यकाळात लादेनला मारले होते, त्यापेक्षा खूप वेगळी आहे.

पत्रकारांना उत्तर देताना ट्रम्प वारंवार ओसामा बिन लादेनचा उल्लेख करत होते. ट्रम्प यांनी दावा केला की, वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर हल्ल्याच्या आधी त्यांनी आपल्या पुस्तकात लादेनबद्दल चेतावणी दिली होती. ते म्हणाले की, माझे म्हणणे ऐकले असते तर आज गोष्टी वेगळ्या असत्या. असे असले तरी तथ्य हे आहे की, ट्रम्प यांनी आपले पुस्तक द अमेरिका व्ही डिजर्व्हमध्ये काहीही लिहिलेले नाही.

ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी परंपरा तोडत स्पीकर आणि डेमोक्रॅट पक्षाचे नेते नॅन्सी पलोसी आणि हाउस इंटेलिजेंस कमिटीचे प्रमुख एडम शिफ यांना देखील या अभियानाबद्दल माहिती दिली नाही.

बराक ओबामा यांच्या कार्यकाळात स्थिती वेगळी होती. लादेनच्या विरोधात कारवाई करण्याआधी ओबामा यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना याबाबत माहिती दिली होती. त्यातील काही रिपब्लिकन नेते हाउस इंटेलिजेंस कमिटीमध्ये देखील होते. ट्रम्प देखील लादेनला ठार केल्याचे श्रेय ओबामा देणे टाळतात.

ट्रम्प यांना बगदादीला ठार करण्याचा फायदा निवडणुकीत होईल असे म्हणणे अवघड होईल. कारण ओबामा यांना देखील लादेनला ठार केल्याचा फायदा निवडणुकीत झाला नव्हता.

Leave a Comment