या झपाटलेल्या घरात 10 तास राहून दाखविणाऱ्याला मिळतील तब्बल 14 लाख रूपये

वॉशिंग्टन येथील समरटाउन येथे स्थित हाउंटेड हाउस मेक मी मॅनर सध्या चर्चेत आहे. मेक मी मॅनरचे मालक मॅक मी यांनी जे या हाउंडेट (झपाटलेल्या) घरात 10 तास राहून दाखवेल त्याला बक्षीस म्हणून 20 हजार डॉलर (14 लाख रूपये) देण्यात येईल असे सांगितले आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घरात जाण्यआधी 40 पानांच्या करारावर सही करावी लागेल. याशिवाय सहभागी होणाऱ्याचे वय 21 पेक्षा कमी नसावे व त्याला मेडिकल प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

हाउंडेट हाउसमध्ये निर्धारित पाइंटपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक सहभागीला मानसिक व शारिरीक आव्हानांचा सामना करावा लागेल. घरात सहभागी होणाऱ्याला भितीदायक मेकअपमध्ये घरात असणाऱ्या दुसऱ्या कलाकारांचा सामना करावा लागेल.

(Source)

मॅक मी यांनी सांगितले की, ते आपल्या हाउंटेड हाउसचे प्रमोशन करत नाहीयेत. ते केवळ दावा करत आहेत की, या आव्हानांचा सामना केल्यावर न घाबरता घरात थांबणे अशक्य आहे. आतापर्यंत घरात न घाबरता कोणीच थांबू शकलेले नाही. सहभागी होणाऱ्या प्रत्येकला घरातील आव्हानांबद्दल संपुर्ण माहिती देण्यात येईल, जेणेकरून ते घरात थांबू शकतील.

मॅक मी म्हणाले की, घरातील 10 तासांचा प्रवास सोपा नाही. घरातील भितीदायक आवाज आणि कलाकार तुम्हाला घाबरवूनच सोडतात.

 

Leave a Comment