…इतना सन्नाटा क्यों है भाई? म्हणत शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा


मुंबई – महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या रणकंदनामध्येच शोले चित्रपटातील रहिम चाचा यांचा डायलॉगचा वापर करून ‘…इतना सन्नाटा क्यों है भाई?’ म्हणत शिवसेनेने देशातील आर्थिक मंदीबद्दल सोमवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या मुखपत्र सामनामध्ये एका संपादकीयमध्ये लिहिले आहे, ‘…इतना सन्नाटा क्यों है भाई?’ या डायलॉगच्या माध्यमातून पक्षाने देश आणि महाराष्ट्रातील आर्थिक मंदीबद्दल सरकारवर निशाणा साधला आहे.

शोले चित्रपटात हा संवाद रहिम चाचा (एके हंगल) यांचा आहे जेव्हा गब्बरसिंग (अमजद खान) नोकरीसाठी बाहेर जात असताना मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह घोड्यावर टाकून गावाला पाठवतो. त्यावेळी सर्व गावकरी शांत असतात आणि दृष्टिहीन खान काका हा प्रश्न विचारतात ‘…इतना सन्नाटा क्यों है भाई?’

शिवसेनेने या संवादाच्या माध्यमातून देशाची आर्थिक मंदी आणि सणासुदीच्या काळात बाजारातील मंदावलेली रेलचेल याला केंद्र सरकारची नोटबंदी आणि चुकीच्या पद्धतीने केलेली जीएसटीची अंमलबजावणी जवाबदार असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी सामनामध्ये लिहिले की, मंदीच्या भीतीने बाजारपेठ शांत झाली आहे आणि विक्री 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाली आहे. उद्योगांची परिस्थिती बिकट आहे आणि उत्पादन करणारी युनिट बंद पडत असल्यामुळे लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. सामनामध्ये पुढे त्यांनी असे देखील लिहिले आहे की बर्‍याच बँकांची अवस्था बिकट आहे, त्यांना आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे आणि लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.

सामनात पुढे लिहिले आहे की, दुसरीकडे सरकारलाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पैसे काढण्यास भाग पाडले गेले आहे. दिवाळीनिमित्ताने बाजारपेठांमध्ये शांतता आहे, परंतु परदेशी कंपन्या ऑनलाईन शॉपिंग साइट्सद्वारे देशाच्या पैशाने आपल्या तिजोऱ्या भरत आहेत. संपादकीय असा दावा करण्यात आला आहे की दिवाळीच्या अगदी आधी झालेल्या विधानसभा निवडणुकादेखील गोंगाट कमी आणि अधिक शांतता होती.

Leave a Comment