जाणून घ्या गाडीत असणाऱ्या सेफ्टी फीचर्स ABS आणि EBD बाबत

ABS आणि EBD ही नाव सध्या वारंवार ऐकायला मिळतात. सरकारने वाहनांमध्ये ABS आणि EBD सारख्या फीचर्सला स्टँडर्ड केले आहे. मात्र तुम्हाला माहितीये का ABS आणि EBD नक्की काय आहे आणि हे गाडीत कसे काम करते ?

काय आहे ABS ?

ABS चे संपुर्ण नाव हे Anti-lock Braking System (एंटी लॉक ब्रेकिंग) असे आहे. हे एक अशी सेफ्टी सिस्टम आहे, जे बाईक अथवा कारला अचानक ब्रेक दाबल्यावर घसरण्यापासून रोखते. याचबरोबर गाडीला नियंत्रणात ठेवते. कारण यामध्ये लावण्यात आलेले वॉल्व आणि स्पीड सेंसरच्या मदतीने अचानक ब्रेक लावल्यावर गाडीची चाके लॉक होत नाहीत आणि गाडी न घसरता थांबते.

जगात सर्वात प्रथम ABS ला 1929 मध्ये एअरक्राफ्टसाठी डिझाईन करण्यात आले होते. तर कारमध्ये याचा वापर 1966 पासून करण्यात येऊ लागला. त्यानंतर 1980 नंतर ABS  सिस्टम कारमध्ये रेग्यूलर करण्यात आली. सरकारने आता प्रत्येक कार आणि बाईकमध्ये (125cc इंजिनवरील) असणे अनिवार्य केले आहे.

ABS सिस्टम कसे काम करते ?

जेव्हा आपण अचानक गाडीचा ब्रेक दाबतो त्यावेळी ब्रेक ऑयल प्रेशरद्वारे ब्रेक पॅड चाकांबरोबर जोडले जातात आणि वेग कमी करतात. गाडी वेगात असताना जोरात ब्रेक लावल्यावर ब्रेड पॅॉ चाकांना चिकटतात. अशा वेळी ABS चे काम सुरू होते. ब्रेक पॅड चाक जाम करत असताना, त्याचवेळी स्पीड सेंसर चाकांच्या वेगाचा सिग्नल ईसीयू (Electronic Control Unit) ला पाठवते. त्यानंतर ईसीयू चाकांचा वेग लक्षात घेऊन हायड्रोलिक यूनिटला सिग्नल पाठवते. हायड्रोलिक सिस्टम ईसीयूद्वारे मिळालेल्या सिग्नलनुसार प्रत्येक चाकाचा वेग कमी करते. चाक जाम होत असताना हायड्रोलिक सिस्टम ब्रेक प्रेशर कमी करते. त्यामुळे चाके फिरू लागतात आणि नंतर ब्रेक प्रेशर वाढवून चाके रोखता येतात. खास गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया सेंकदात होते व गाडीची चाक जाम होत नाहीत. त्यामुळे गाडी सहज वळवता देखील येते. प्रेशर कमी जास्त केल्याने ब्रेकिंग सिस्टम कमी होते.

EBD काय आहे ?

EBD ला Electronic break force सिस्टम म्हटले जाते. ही एक अशी सिस्टम आहे जी, गाडीचा वेग, वजन आणि रसत्याच्या परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या चाकांना वेगवेगळे ब्रेक फोर्स देते. गाडीचा अचानक ब्रेक दाबताच गाडी पुढच्या दिशेने दबली जाते  आणि जेव्हा गाडी वळवली जाते तेव्हा गाडीचे वजन आणि त्यातील प्रवाशांचे वजन एकाबाजूला होते. ईबीडी सिस्टम नसेल तर अचानक ब्रेक दाबताच गाडी घसरण्याची शक्यता असते.

वेगवेगळी सिस्टम –

ABS आणि EBD या दोन्ही वेगवेगळ्या सिस्टम आहेत. मात्र या दोन्ही सिस्टम वाहनात सोबत काम करतात. त्यामुळे दोघांचे नाव सोबतच घेतले जाते.

ABS आणि EBD चे फायदे –

ज्या वाहनांमध्ये ABS आणि EBD सिस्टम असते. त्यात अचानक ब्रेक लावल्यानंतर स्टेअरिंग कंट्रोलमध्ये राहते. वेगात असताना अचानक ब्रेक दाबल्यावर गाडीची चाक जाम होत नाहीत. ABS आणि EBD सिस्टम गाडी वेगात असतानाच ब्रेक दाबल्याच गाडीला घसरण्यापासून रोखते. या सिस्टम गाडीची ब्रेकिंग सिस्टम कंट्रोल करतात. ज्या गाड्यांमध्ये ही सिस्टम लावण्यात आलेली असते, त्यांची किंमत देखील थोडी अधिक असते. मात्र सुरक्षेसाठी हे फीचर्स उपयोगी आहेत.

Leave a Comment