50 वर्षांपुर्वी सापडलेल्या त्या कीटकाला देण्यात आले ग्रेटा थनबर्गचे नाव

स्विडीश पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गचे नाव एका कीटकास देण्यात आले आहे. या कीटकाचा शोध 1965 मध्ये लागला होता, मात्र आतापर्यंत याला नाव देण्यात आलेले नव्हते. पर्यावरण संरक्षणाबद्दल ग्रेटाचे असलेल्या योगदानामुळे हे नाव देण्यात आले आहे. या कीटकास ‘नेलोपटोड्स ग्रेटी’ हे नाव देण्यात आले आहे. एंटोमोलॉजिस्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हा किडा 1 मिमी लांब असून, त्याला डोळे आणि पंख देखील नाहीत.

या कीटकाच्या डोक्यावर असलेले एंटीने पिगलेट्स सारखे दिसतात. नॅच्युरल हिस्ट्री म्यूझियम, लंडनच्या एक्सपर्टनुसार, ग्रेटा ही निर्भिड आहे व ती जगासमोर पर्यावरण संरक्षण अभियानासंबंधी न घाबरता आपले मत मांडते. तिचे काम प्रशसनीय आहे.

म्यूझियमचे सायंटिफिक असोसिएट डॉ. मायकल डर्बे यांनी सांगितले की, हे कीटक निसर्गशास्त्रज्ञ डॉ. विलियम ब्लॉक यांना 1965 केनियामध्ये आढळले होते. त्यानंतर त्यांनी 1978 ला नॅच्युरल हिस्ट्री ऑफ म्यूझियमला हे कीटक दिले.

या कीटकाचे नाव ठरवण्यासाठी 50 वर्षांपेक्षा अधिक वर्ष लागली. हा किडा टिलिएडी कुटूंबातील आहे. जे जगातील सर्वात छोट्या कीटकांचे कुटूंब आहे.

Leave a Comment