मेड इन इंडिया ‘पाव-भाजी’च्या इतिहासाची नाळ अमेरिकेशी जोडलेली

पाव-भाजी म्हटले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. अनेक शहरांमध्ये दररोज पाव-भाजी खाण्यासाठी तुफान गर्दी होते. चविष्ट पाव-भाजी प्रमाणे याचा इतिहास देखील असाच मजेदार आहे. पाव-भाजीचा हा इतिहास अमेरिकेशी देखील जोडलेला आहे. आज पाव-भाजीचा इतिहास जाणून घेऊया.

अमेरिकेतील गृहयुध्दाच्या (1861-1865) काळात कॉटनची मागणी वाढली असताना, पाव-भाजीचा शोध लागला. कॉटनसाठी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये दिवस-रात्र कपड्यांची निर्मिती होऊ लागली. मोठ्या प्रमाणात कपड्यांचे उत्पादन करावे लागत असल्याने कामगारांना दिवस-रात्र काम करावे लागत होते.

(Source)

यामुळे कामगारांना जेवणासाठी देखील खूप कमी वेळ मिळत होता. त्यामुळे गिरणींच्या बाहेर असलेल्या दुकानदारांचे देखील नुकसान होऊ लागले. त्यावेळी त्यांनी वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन एक नवीन डिश तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही डिश अनेक भाज्या, टॉमेटो, बटाटा यांच्यामध्ये मिक्सकरून भाजी तयार केली व ती पावासोबत दिली. ही नवीन भाजी खाण्यास खूपच चविष्ट होती आणि विशेष म्हणजे हे खावून कामावर त्वरित परत जाता येत असे.

हल्फे-फुल्के खाल्याने त्यांना झोप देखील येत नसे व याची किंमत देखील खूप कमी होती. या चविष्ट भाजीचा स्वाद लोकांना एवढा आवडला की, हळूहळू संपुर्ण महाराष्ट्रात आणि नंतर पुर्ण देशात ही डिश लोकप्रिय झाली. आता पाव-भाजी छोट्या-मोठ्या हॉटेल्सपासून ते फाइव्ह स्टारमध्ये देखील सर्व करण्यात येते.

(Source)

प्रत्येक शहरामध्ये एक प्रसिध्द पाव-भाजीचे ठिकाण नक्की असते. मुंबईमधील सर्वोत्तम पाव-भाजीचे ठिकाण हे सरदारजी की पावभाजी हे आहे. हे मुंबईच्या तारादेव रोडवरील जंक्शनवरील प्रसिध्द रेस्टोरेंट आहे.

Leave a Comment