गिटारच्या आकाराचे जगातील पहिले हॉटेल, एका रात्रीचे इतके आहे भाडे

जगभरात अशी अनेक हॉटेल्स आहेत जी आपल्या विचित्र आकारामुळे, बनावटीमुळे प्रसिध्द आहेत. असेच एक हॉटेल अमेरिकेतील फ्लोरिडा येथील हॉलिवूडमध्ये आहे. हे हॉटेल गिटारच्या आकाराचे आहे. या प्रकारचा आकार असणारे हे जगातील पहिलेच हॉटेल आहे. काही दिवसांपुर्वीच हे हॉटेल ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेले आहे.

(Source)

या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी तुम्हाला तब्बल 70 हजार रूपये मोजावे लागतील. या हॉटेलमधील 638 लग्झरी रूम्स बनवण्यासाठी तब्बल 10.62 हजार कोटी रूपये खर्च आला आहे.

(Source)

450 फूट उंच या हॉटेलमध्ये एक मोठा हॉल देखील बनवण्यात आलेला आहे. या हॉलमध्ये एकाचवेळी 6500 लोक बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतील.

(Source)

या हॉटेलमध्ये 19 रेस्टोरेंट आहेत. याशिवाय या भागात 13 एकरमध्ये पसरलेले लॅगून पूल, 32 हजार वर्ग फूटमध्ये बनलेला स्पा आणि सॅलून देखील आहे.

(Source)

32 मजल्यांचे हे हॉटेल इंजिनिअरिंगची अजब कलाकृती असल्याचे म्हटले जात आहे. खास गोष्ट म्हणजे या हॉटेलच्या बाजूलाच 168 खोल्यांचे सेव्हन स्टार ओएसिस टॉवर देखील आहे.

Leave a Comment