लवकरच आशियातील शहरांमध्ये सुरू होणार ‘हवाई टॅक्सी’ सेवा

आशिया खंडातील देश सिंगापूरमध्ये लवकरच ड्रोनप्रमाणे उडणारी टॅक्सी दिसणार आहे. काही दिवसांपुर्वीच या फ्लाइंग टॅक्सीचे परिक्षण करण्यात आले आहे. ही फ्लाइंग टॅक्सी बनविणाऱ्या कंपनीला आशा आहे की, यामुळे वाहतूक क्षेत्रात एक नवीन क्रांती होईल. 18 प्रोपेलर ड्रोन टॅक्सीला जर्मनीची कंपनी वोलोकॉप्टरने बनविले आहे.

काही दिवसांपुर्वीच वोलोकॉप्टरने सिंगापूर ते मरीना बे भागात जवळपास 3 मिनिटे उड्डाण घेतले. होवर टॅक्सी या छोट्या हॅलिकॉप्टर प्रमाणेच आहेत. या होवर टॅक्सी ड्रोन सारख्या तंत्रज्ञानानेच संचालित केल्या जातील. वोलोकॉप्टरने या आधी दुबई, हेलसिंकी, जर्मनी आणि लाँस वेगसमध्ये देखील या टॅक्सीचे परिक्षण केले आहे.

व्यावसायिक स्वरूपात पुढील 2 ते 4 वर्षांमध्ये या होवर टॅक्सीचा वापर सुरू करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्लोरियन रियूटर यांनी सांगितले की, आमचे लक्ष्य हे जकार्ता, मनिला आणि बँकॉक येथे हे तंत्र घेऊन जाण्याचे आहे. तेथे याची सर्वात अधिक गरज आहे.

त्यांनी सांगितले की, लवकरच आम्ही भारत आणि चीनमध्ये देखील याची सुरूवात करू. सिंगापूरमध्ये याचा वापर मरीना बे ते सेंटोसा द्वीपसाठी होईल. काही दिवसांपुर्वीच वॉलोकॉप्टरसाठी वोलोपोर्टचे (फ्लाइंग टॅक्सी पोर्ट) अनावरण करण्यात आले आहे. या टॅक्सी वाहतूकीसाठी आणखी एक पर्याय म्हणून समोर येतील.

Leave a Comment