संशोधक म्हणतात, वेदनाशामकांपेक्षा बीयर अधिक प्रभावी!


वेदनाशामक औषधे घेण्यापेक्षा दोन ग्लास बीयर घेणे हे वेदना विसरण्याचा अधिक प्रभावी उपाय आहे, असा निष्कर्ष ग्रिनव्हीच विद्यापीठाच्या संशोधकांनी काढला आहे. जर्नल ऑफ पेन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

“अल्कोहोल हा अत्यंत प्रभावी वेदनाशामक आहे, याचा भक्कम पुरावा आम्हाला आढळले आहे. कोडेनसारख्या औषधाशी त्याची तुलना करता येऊ शकेल आणि त्याचा परिणाम पॅरासिटोमॉलपेक्षा जास्त असतो,” असे हे संशोधन करणाऱ्या चमूचे प्रमुख डॉ. ट्रेव्हर थॉम्पसन यांनी सन या वृत्तपत्राला सांगितले.

सांधेदुखीसारख्या चिवट वेदनांचा त्रास होणाऱ्या ४०४ व्यक्तींच्या १८ संशोधनाचा या संशोधकांनी अभ्यास केला. रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण सुमारे ०.०८ टक्के एवढे झाले तर वेदनेची सीमा किंचित वाढते तसेच वेदनेची तीव्रता मध्यम किंवा खूप कमी होते, असे या संशोधनात आढळले आहे.

वेदनेच्या सीमेसाठी या संशोधकांनी अल्कोहोल व अल्कोहोलविरहीत अशा १३ चाचण्या घेतल्या आणि वेदनेच्या तीव्रतेसाठी ९ चाचण्या घेतल्या.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment