दहा लाख डॉलरचा मालक झाला कुत्रा


न्यूयॉर्क : अमेरिकेत आपल्या पाळीव श्वानाच्या नावे ६० वर्षांच्या एका महिलेने दागदागिने आणि घरासह सुमारे दहा लाख डॉलरची (जवळपास सहा कोटी रुपये) संपत्ती केली आहे. माल्टीज टेरियर प्रजातीचा श्वान बेला मियाच्या नावे न्यूयॉर्क येथील रहिवासी एन. बोल्सनी यांनी आपली सर्व संपत्ती केली आहे. त्याला आम्ही भव्य जीवन देण्याचा निर्णय घेतला असून त्याच्यावर आम्ही खूप प्रेम करतो. केवळ तीन वर्षांच्या काळात त्याने एवढे काही केले आहे जे करण्यासाठी बहुतांश लोकांना संपूर्ण हयात लागते, असे त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले. बोल्सनी यांना लईस (३८) आणि रॉबर्ट (३२) अशी दोन मुले आहेत. त्यांची आपल्या निर्णयाबाबत काहीही तक्रार नाही. माझी मुले मोठी झाली असून, यशस्वी आहेत. माझ्या पैशांची गरज त्यांना नसल्याचे बोल्सनी यांनी म्हटले.

Leave a Comment