उत्तर कोरिया तोडणार जगातील पहिले तरंगणारे हॉटेल

1988 मध्ये बनलेले जगातील पहिले तरंगणारे हॉटेल ‘फोर सीझन ग्रेट बेरियर रीफ’ तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या हॉटेलला ‘समुद्रातील तरंगणारी जन्नत’ देखील म्हटले जात असे. या 7 मजली हॉटेलमध्ये 200 रूम्स, एक नाइट क्लब, बार आणि टेनिस कोर्ट देखील आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपल्या देशातील माउंट कुमगांग भागात बनलेल्या दक्षिण कोरियाची जूनी हॉटेल व पर्यटन स्थळांना तोडून नवीन गोष्टींचे निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये या तरंगणाऱ्या हॉटेलचा देखील समावेश आहे.

माउंट कुमगांग दक्षिण कोरियातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय होते. येथील पर्यटन उत्तर कोरियासाठी उत्पादनाचे प्रमुख साधन होते. मात्र 2008 मध्ये या ठिकाणी गोळीबाराच्या घटनेत एका पर्यटकाचा मृत्यू झाला. त्यानंतर दक्षिण कोरियाने माउंट कुमगांगमध्ये आपल्या पर्यटकांना पाठवण्यास बंदी घातली.

सुरूवातीला हे तरंगणाऱ्या हॉटेलचा वापर ऑस्ट्रेलियातील तटापासून 40 किमी लांब समुद्रात करण्यात आला. मात्र 1 वर्षांनी 1989 मध्ये एका व्हिएतनामच्या कंपनीने हे हॉटेल खरेदी केले. व्हिएतनामच्या हो ची मिन्ह सिटीमध्ये हे एक प्रसिध्द नाइट स्पॉट झाले. मात्र आर्थिक संकटामुळे 1997 मध्ये उत्तर कोरियाने हे हॉटेल खरेदी केले.

 

Leave a Comment