…म्हणून कॉम्प्युटर गेम्समध्ये पुरूषांच्या जागी दिसणार महिला कॅरेक्टर हिरो

अफगाणिस्तानच्या कोडिंग करणाऱ्या मुलींनी एनिमेशन व्हिडीओमधून पुरूष कॅरेक्टर्सला पुर्णपणे काढून टाकले आहे. त्यांच्या जागी महिला कॅरेक्टरला हिरो बनवण्यात आले आहे. या मुलींचे म्हणणे आहे की, खऱ्या हिरो तर या मुली आहेत, ज्या दररोज स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत असतात. 12 मुलींच्या गटाने सहा महिन्यात ‘अफगाण हिरो गर्ल’ गेम बनविली आहे. ही गेम देशातील मुलींमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

यो मोहिमेची सुरूवात कॉम्प्युटरच्या शिक्षिका आणि शरणार्थी फरेश्ते फोरोहो यांनी केली. त्यांनीच 2015 मध्ये कोड टू इंस्पायर मोहिमेची सुरूवात केली होती. फोरोहो सांगतात की, सर्व विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, व्हिडीओ गेम्स आणि अॅप्समध्ये पुरूष हिरो बघून कंटाळा आला आहे. गेमिंग इंडस्ट्रीमध्ये मुलींना जागाच देण्यात आलेली नाही. यामुळे मुलींचे प्रतिनिधित्व असणाऱ्या गेम्स आणि अॅप बनवले आहेत.

फोरोहो यांच्यानुसार, देशात मुलींसाठी शैक्षणिक आणि रोजगाराची खूपच कमी संधी आहे. इंटरनेटचा प्रसार देखील खूप कमी आहे. प्रत्येक पावलांवर भेदभाव सहन करावा लागत आहे. अशावेळी आपण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठे बदल घडवू शकतो. त्यांनी सांगितले की, आम्ही जे काम करत आहोत ते समानता आणि सशक्तिकरणासाठी आहे. याद्वारे आम्ही मुलींना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानतेसाठी लढण्यासाठी प्रेरित करू शकतो.

या गेम्समध्ये महिला कॅरेक्टर्स बहादूर आणि लढाऊ दाखवण्यात आल्या आहेत. शत्रूंशी सामना करताना मुली कशाप्रकारे कामगिरी करतात ते यात दाखवले आहे.

Leave a Comment