व्हिवोचा iQoo Neo 855 स्मार्टफोन लाँच

व्हिवो कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन iQoo Neo 85 चीनमध्ये लाँच केला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे व 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या व्यतरिक्त बाकी सर्व फीचर्स हे iQoo Neo प्रमाणेच आहेत.

व्हिवो iQoo Neo 855 चार व्हेरिंएटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 6जीबी+64जीबी व्हेरिंएटची किंमत 1998 युआन (20000 रूपये) आहे. 6जीबी+128जीबी व्हेरिंएटची किंमत 2298 युआन (23,000 रूपये), 8जीबी+128जीबी व्हेरिंएटची किंमत 2498 युआन (25 हजार रूपये) आणि 8जीबी+256जीबी व्हेरिंएटची किंमत 2698 युआन (27 हजार रूपये) आहे. हा स्मार्टफोन निळ्या, काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये मिळेल.

(Source)

स्पेसिफिकेशन –

ड्युल सिम (नॅनो) सपोर्ट असणारा हा स्मार्टफोन अँड्राईड 9 पायवरील Funtouch OS 9 वर चालतो. यामध्ये 6.38 इंच फूल एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिजॉल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. यामध्ये 2.84GHz ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर मिळेल.

(Source)

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 12 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.

या फोनची खास गोष्ट म्हणजे यात 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली असून, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Leave a Comment