स्टेट बँकेला झाला ‘इतक्या’ कोटींचा फायदा


मुंबई: आपल्या तिमाहीत झालेल्या उत्पन्नाची आकडेवारी भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) जाहीर केली आहे. यानुसार एसबीआयला मोठ्या प्रमाणात नफा झाल्याचे दिसून येत आहे. एसबीआयला जुलै-सप्टेंबर या तिमाहीत ३०११.७३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. एसबीआयच्या नफ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एसबीआयला २०१८ सालच्या तिमाहीत ९४४.८७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. एसबीआयने यंदाच्या वर्षीच्या तिमाहीतील उत्पन्नाची शुक्रवारी घोषणा केली. यावरुन दिसून येते की, एसबीआयला मिळणाऱ्या व्याजामुळे बँकेची आर्थिक स्थिती आणखीन मजबूत झाली असून बँकेच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे.

७.५६ टक्क्यांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये एसबीआयच्या शेअर्समध्ये वाढ होत २८२.३५ रुपयांवर पोहोचला आहे. बँकेच्या शेअर्समध्ये आलेल्या या तेजीमुळे कंपनीचे बाजारी भांडवल १६,८६८.०६ कोटी रुपयांवरुन २,५१,३१७.०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयला एवढा मोठा लाभ झाल्याने त्याचा मोठा फायदा बँकेला होणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय स्टेट बँकेला जुलै-सप्टेंबर या काळात मिळालेल्या व्याजामुळे बँकेच्या उत्पन्नात १७ टक्क्यांनी वाढ झाली असल्यामुळे हे उत्पन्न २४,६०० कोटी रुपये झाले आहे. तर ग्रॉस एनपीए ७.१९ टक्क्यांहुन कमी झाला आहे. या दरम्यान बँकेचा ग्रॉस एनपीए १,६१,६३६ कोटी रुपये झाला आहे.

Leave a Comment