आता डीटीएचधारकांना देखील करावी लागणार KYC


मुंबई : या वर्षाच्या सुरुवातील टीव्हीच्या अनेक नियमांमध्ये टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) बदल केले आहेत. टीव्ही पाहणाऱ्यांसाठी आता नवा नियम लागू करण्यात आला आहे. डीटीएच सबस्क्रायबर्ससाठी ट्रायने केवायसी बंधनकारक केली आहे. ट्रायने देशातील सर्व केबल ऑपरेटर्सना आदेश दिले आहेत की, केवायसी सर्व सबस्क्रायबर्सना करावी लागणार आहे. केवायसीची ही प्रक्रिया सोपी आहे.

सध्याचे ग्राहक आणि नवीन डीटीएच सबस्क्रायबर्ससाठी ट्रायचा नवा नियम लागू आहे. सध्याच्या ग्राहकांना केवायसी करण्यासाठी 2 वर्षांचा वेळ देण्यात आला आहे. तर नव्याने कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना आधी केवायसी करावे लागेल. त्यानंतर नवीन डीटीएच कनेक्शन सोबत मिळणाऱा सेट टॉप बॉक्स इन्स्टॉल केला जाईल. केवायसीसाठी ग्राहकांना आधारकार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, पासपोर्ट यासारख्या कागदपत्रांची झेरॉक्स द्यावी लागते.

DTH साठी KYC करण्यासाठी इंडस्ट्रीतील स्टेकहोल्डर्सची परवानगी मिळाल्यानंतर नवीन नियम लागू केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून यावर चर्चा होत होती. केवायसी नवीन कनेक्शन इन्स्टॉल करण्यापूर्वी करावी लागेल. त्यानंतर नवीन सेट टॉप बॉक्स सुरू होईल. ज्या ठिकाणी सेट टॉप बॉक्स लावायचा आहे तिथलाच पत्ता कनेक्शनच्या अर्जावर असणे आवश्यक आहे. ग्राहकांची ओळख पडताळण्यासाठी केबल ऑपरेटरच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड पाठवण्यात येईल. त्यानंतर सेट टॉप बॉक्सच्या इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू होईल.

मोबाईल ज्या ग्राहकांकडे नाही त्यांना ओळखपत्र द्यावे लागेल. तसेच सध्याच्या ग्राहकांमध्ये ज्यांच्या डीटीएचला मोबाइल नंबर लिंक नाही त्यांनी 2 वर्षात ते करून घ्यावे लागेल. केबल ऑपरेटर्सना ग्राहकांच्या पडताळणीची कागदपत्रे गोळा कऱण्याची परवानगी आहे. पण सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या ठिकाणाची माहिती गोळा करता येणार नाही.

Leave a Comment