या कारणामुळे कारमध्ये एअरबॅग असणे आहे गरजेचे

एअरबॅग आता प्रत्येक कारमधील स्टँडर्ड फीचर झाले आहे. कोणत्याही कारमध्ये ड्रायव्हर साइड एअरबॅग असणे गरजेचे आहे. भारतात लाँच होणाऱ्या बहुतांश गाड्यांमध्ये आता एअरबॅग देण्यात येत आहे. यामुळे अपघाताच्या वेळी ड्रायव्हरचे प्राण वाचतात. सध्या कारमध्ये येणाऱ्या एअरबॅगला SRS एअरबॅग असे देखील म्हटले जाते. SRS चा अर्थ Supplemental Restraint System हा आहे. हे सांगते की, कार सुरू करताच कारच्या मीटरमध्ये लागलेले एसआरएस इंडिकेटर काही सेंकदांसाठी जळतात. जर एसआरएस इंडिकेटर काही सेंकदानंतर देखील बंद न होता जळतच राहिले तर समजून जा की, एअरबॅगमध्ये काहीतरी अडचण आहे.

एअरबॅग कसे काम करते ?

गाडीच्या बंपरवर एक इंपॅक्ट सेंसर लावलेले असते. गाडी एखाद्या गोष्टीला धडकताच इंपॅक्ट सेंसरच्या मदतीने एअरबॅगच्या सिस्टमला करंट बसतो. एअरबॅगच्या आत एक गॅस भरलेली असते. इपॅक्ट सेंसरने करंट पाठवताच एअरबॅगमधील वस्तू गॅसमध्ये रूपांतरित होते. एअरबॅग कॉटनपासून बनवलेली असते व यावर सिलिकॉनची कोटिंग केले जाते. 1 सेंकदापेक्षा कमी वेळात ताशी 300 किमी वेगाने बंद एअरबॅग उघडली जाते.

ठराविक कालावधीनंतर एअरबॅग बदला –

प्रत्येक गोष्टीची एक एक्सपायरी डेट असते, त्याचप्रमाणे एअरबॅग देखील एक्सपायर होऊ शकते. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर एअरबॅग बदलणे गरजेचे आहे. एअरबॅगसाठी ज्या पार्ट्सचा वापर करण्यात येतो, ते पार्ट्स अगदी मजबूत असतात. मात्र एअरबॅग्स इग्नाइटरवर निर्भर असतात.

एअरबॅग उघडल्यामुळे देखील जातात प्राण –

अनेकवेळा दिसून आले आहे की, एअरबॅग एवढ्या वेगाने उघडले जाते की, त्यामुळे चालकाचा मृत्यू होतो. अनेक अपघातात दिसून आले की, एअरबॅग एवढ्या वेगाने उघडले जाते की, चालकाचे यकृत फुटते व त्यामुळे मृत्यू होतो.

कारचे सिल्ट बेल्ट्स देखील एअरबॅग फंक्शनशी लिंक असतात. एअरबॅग बनविताना या गोष्टीची काळजी घेण्यात येते की, चालकाने सीट बेल्ट लावलेला आहे. त्यामुळे एअरबॅग्सवर निर्भर न राहता, गाडी चालवताना सीट बेल्ट नक्की लावावा.

Leave a Comment