या ठिकाणी बनवण्यात आली आहे यूएफओच्या आकाराची ‘एलियन सिटी’

डेनमार्कची राजधानी कोपेनहेगनच्या ब्रॉन्डबी भागात एक कॉलोनी बनविण्यात आली आहे. या कॉलोनीला गार्डन सिटी असे नाव देण्यात आले आहे. मात्र या कॉलोनीच्या सुंदरतेमुळे आणि आकारामुळे याला ‘एलियन सिटी’ म्हणून देखील ओळखले जाते. कॉलोनीमधील ही घर खास पर्यटकांसाठी बनविण्यात आली आहेत. जेणेकरून सुट्यांमध्ये पर्यटक येथे येऊन निवांत राहू शकतील. एका महिन्याचे एका घराचे भाडे 118 डॉलर (10 हजार रूपये) आहे.

या गार्डन सिटीचे डिझाईन लँडस्कॅप आर्किटेक्ट एरिक मायगिंडने 1964 मध्ये तयार केले होते. गार्डन सिटीमध्ये छोट्या छोट्या गोल कॉलोनी बनविण्यात आल्या आहेत. एका कॉलोनीमध्ये 16 घर आहेत.

या एलियन सिटीमध्ये पार्किंगपासून ते गार्डनपर्यंत सर्व गोष्टींची सुविधा आहे. या ठिकाणी पर्यावरणासाठी सुंगधी फुले आणि झाडे लावण्यात आली आहेत.

Leave a Comment