‘क्वॉलिटी जर्नलिज्म’ला प्रोत्साहन देण्यासाठी फेसबुकने सुरू केली स्वतःची न्यूज सर्विस

सोशल मीडिया साइट फेसबुकने आपली बातमी सेवा (न्यूज सर्विस) सुरू केली आहे. यासाठी कंपनीने काही ठराविक वृत्त प्रकाशित करणाऱ्या संस्थांशी भागिदारी देखील केली आहे. या सेवेसाठी फेसबुक एक वेगळे आणि नवीन टॅब देईल. सध्या ही सेवा अमेरिकेतील केवळ 2 लाख युजर्ससाठी सुरू करण्यात येईल. या परिक्षणानंतर ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध असेल.

फेसबुकची ही सेवा चार श्रेणींमध्ये सुरू करण्यात येईल. यामध्ये सामान्य (जनरल), सामयिक (टॉपिकल), विविध (डायवर्स) आणि स्थानिक (लोकल) अशा श्रेणी असतील.

फेसबुक आल्या न्यूज सेवेमध्ये सुरूवातीला द न्यूयॉर्क टाइम्स, द लॉस एंजिलेस टाइम्स, ब्लूमबर्ग मीडिया, यूएसए टुडे पब्लिशर अशा न्यूज वेबसाइट्सना लायसेंन्स फी देईल. याचबरोबर कंपनी 200 न्यूज साइट्स यामध्ये समाविष्ट करण्याचा विचार करत आहे.

असे दिसतील आर्टिक्लस –

फेसबुकच्या पेजवर सायन्स अँन्ड टेक, स्पोर्टर्स, एंटरटेनमेंट, बिझनेस, हेल्थ आणि अन्य कॅटेगरी असेल. युजर्सला या प्लॅटफॉर्मवर न्यूज सब्सस्क्रिप्शन खरेदी करण्याची सुविधा असेल. फेसबुक यासाठी स्वतःची एक टीम ठेवेल, जी दिवसभरातील महत्त्वपुर्ण बातम्या निवडण्याचे काम करेल.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गने क्वॉलिटि जर्नलिज्मला प्रोत्साहन देण्यासाठी फेसबुक न्युज सेक्शन्सची सुरूवात केली आहे. यामुळे फेसबुकवर फेक न्यूजला लगाम बसेल.

Leave a Comment