चिलीत लाखो नागरिक का उतरलेत सरकारच्या विरोधात रस्त्यावर ?

दक्षिण अमेरिकेतील देश चिलीत सध्या सरकारच्या विरोधात लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. चिलीमध्ये मेट्रोच्या भाड्यामध्ये 30 टक्क्यांनी वाढ केल्यामुळे मागील एक आठवड्यांपासून विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. आर्थिक सुधारणा आणि राष्ट्रपती सेबेस्टियन पिनेरो यांच्या राजीनाम्याची मागणी निदर्शन करणारे करत आहेत. सैंटियागोमध्ये निदर्शकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. या आंदोलनाची चर्चा आता सोशल मीडियावर देखील होऊ लागली आहे.

या आंदोलनानंतर सरकारने काही आर्थिक सवलतींच्या घोषणा देखील केल्या. मात्र आंदोलक संतुष्ट झालेले नाहीत. या प्रदर्शनामध्ये 18 लोकांचा मृत्यू झाला आहे.

चिलीत आंदोलना दरम्यान ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यात 4 परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. तर 5 जणांचा मृत्यू सुरक्षा कर्मचाऱ्यांमुळे झाला आहे. 17 ऑक्टोंबरपासून आतापर्यंत 535 लोक जखमी झाले आहेत. 2400 पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांना आतापर्यंत सरकारने अटक केली आहे.

लोकांचा वाढता विरोध बघून राष्ट्रपती पिनेरो यांनी लवकरच नागरिकांच्या पेंशनमध्ये 20 टक्क्यांनी वाढ करणार असल्याचे देखील म्हटले आहे. याशिवाय वीज देखील मोफत देण्यात येईल असे सांगितले. वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. मात्र असे असले तरी देखील नागरिक संतुष्ट झालेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रपतींनी आणीबाणीची घोषणा केली आहे.

चिलीमध्ये संयुक्त राष्ट्र हवामान बदल सम्मेंलन पार पडणार आहे. अशा प्राश्वभूमीवर चिलीमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे.

 

Leave a Comment