आई-वडीलांच्या गिफ्टमुळे अब्जाधीश झाला चीनचा हा 24 वर्षीय युवक


वॉशिंग्टन – पालकांकडून आपल्याला मिळालेल्या भेटवस्तु या अमूल्य असतात. परंतु, जर पालकांकडून मिळालेल्या भेटवस्तुमुळे एखादा मुलगा अब्जाधीश झाला तर काय म्हणाल. असचे काहीसे 24 वर्षीय एरिक त्सेच्या बाबतीतही घडले आहे. त्याच्या आई-वडिलांनी दिलेल्या भेटवस्तूमुळे तो रातोरात अब्जाधीश झाला आहे. वस्तुतः असे घडले की अमेरिकेत पेनसिल्व्हेनिया येथे चीनच्या सिनो बायो-फार्मास्युटिकल संस्थापक त्से पिंग आणि त्यांची पत्नी चेउंग लिंग चेंग यांनी कंपनीचे 21.5 टक्के हिस्सेदारी मुलगा एरिक त्से याला भेट म्हणून दिली.

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, एरिकच्या पालकांनी या आठवड्याच्या सुरुवातीला ही भेट त्याला दिली. त्याला भेटवस्तूंमध्ये मिळालेला हिस्सा कंपनीच्या भांडवलाचा पाचवा हिस्सा आहे. कंपनीची हिस्सेदारी 3.8 अब्ज डॉलर्स (सुमारे 26,980कोटी रुपये) आहे. अहवालात असे म्हटले आहे की कंपनीच्या या भागभांडवलातून एरिक त्से वर्षाला दीड दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्तची कमाई करु शकेल. यासह आता एरिक जगातील 550 श्रीमंत लोकांपैकी एक बनला आहे.

सिनो बायो-फार्मास्युटिकल असे म्हणतात की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश होण्यास एरिकला रस नाही. एरिकची संपत्ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, हॉलीवूडचे दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग आणि स्टारबक्सचे संस्थापक हॉवर्ड शल्त्झ यांच्यापेक्षा अधिक आहे, असे अहवालात म्हटले आहे. एरिकचा जन्म सिएटल येथे झाला आणि त्याने बीजिंग आणि हाँगकाँगमध्ये शिक्षण घेतले. त्याने पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूल ऑफ फायनान्समधून पदवी प्राप्त केली.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालात म्हटले आहे की एरिक हाँगकाँगमधील किमान पाच इतर कंपन्यांचा संचालक आहे. तो म्हणाले की माझ्या पालकांनी आणि ज्येष्ठांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले आणि माझ्या क्षमतांवर विश्वास ठेवला. जेव्हा मी 1वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवेण असा विचार करायचो. मी असा प्रयत्न करेन मला जी सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे ती माझ्याशी निगडीत प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचविण.

Leave a Comment