धनतेरसला ऑटो सेक्टरची चांदी, मर्सिडीजने एकट्या दिल्लीत विकल्या 250 कार्स

ऑटो सेक्टरमध्ये मंदी असली तरी धनतेरसचा दिवस कंपन्यांसाठी चांगला गेला आहे.  धनतेरसच्या दिवशी दिल्ली एनसीआरमध्ये 250 मर्सिडीज बेंझ गाड्यांची डिलिव्हरी करण्यात आली आहे. धनतेरसच्या दिवशी वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र यंदा लोकांनी सोन्या-चांदीपेक्षा गाडी खरेदी करणे पसंद केले आहे.

मर्सिडीज बेंझबरोबरच ह्युंडाई, किया मोटर्स, एमजी मोटर्ससाठी देखील हा दिवस चांगला होता. या कंपन्यांनी या दिवशी 15 हजारांपेक्षा अधिक गाड्यांची डिलिव्हरी केली. देशातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी ह्युंडाईने शुक्रवारी तब्बल 12,500 कार्सची डिलिव्हरी केली. किया मोटर्सने एसयूव्ही सेल्टॉसच्या 2,148 यूनिट्सची डिलिव्हरी केली. याशिवाय एमजी हेक्टरने 700 गाड्यांची डिलिव्हरी केली. यातील 200 गाड्यांची डिलिव्हरी दिल्ली एनसीआरमधील एकाच शोरूममधून करण्यात आली.

मंदीचा फटाका बसलेल्या ऑटो सेक्टरला यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. ह्युंडाई सेल्स अँन्ड मार्केटिंग हेड विकास जैन यांनी सांगितले की, आम्ही दररोज 2 हजार गाड्यांची डिलिव्हरी करत असून, धनतेरसच्या दिवशी 12,500 गाड्यांची विक्री केली. मागील वर्षींच्या तुलनेत ही विक्री 25 टक्क्यांनी अधिक आहे.

गाड्यांच्या तुलनेत सोन्या-चांदीच्या विक्रीमध्ये मात्र घट आली आहे.

 

Leave a Comment