ट्विटरवर ट्रेंड होत आहे #AadityaTeraVaada


मुंबई – शुक्रवारी ट्विटरवर भारतात वरळी मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेलेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यामागे कारणही तसेच आहे. आदित्य ठाकरे यांनी मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्याला विरोध केला होता. त्यांनी त्यावेळी आम्ही सत्तेत आल्यावर आरे कॉलनीला जंगल घोषित करू, असे आश्वासन दिले होते. आता त्यावरूनच ट्विटरवर हजारो लोक #AadityaTeraVaada हा हॅशटॅग वापरून आदित्य यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देत आहेत.

आता आदित्य ठाकरे सत्तेत आले असल्यामुळे आता त्यांनी त्यांची ताकद फक्त ट्विटरवर दाखवून देऊ नये. त्यांच्या कृतीतूनही दाखवून द्यावी, असे ऍनी नावाच्या व्यक्तीने म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी आरेतील वृक्षतोड केल्यानंतर हा वाद भाजप विरुद्ध शिवसेना असा नसल्याचे म्हटले होते. त्याचवेळी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड विरुद्ध पर्यावरण असा हा वाद असल्याचे त्यांनी सांगितले होते. ते आता सत्तेत आल्यावर मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनविरुद्ध काय कारवाई करणार, असा प्रश्न एका युझरने आदित्य ठाकरे यांना विचारला आहे. आता शिवसेना सत्तेत आली असल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी त्यांचे आश्वासन पाळले पाहिजे आणि आरेला जंगल घोषित केले पाहिजे, असे दुसऱ्या युझरने म्हटले आहे.

Leave a Comment