1 मिनिट शाळेत उशीरा आल्यास चीनमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येते ही भयंकर शिक्षा

चीनच्या हेनान येथील टेक्निकल सेंकडरी शाळेत वर्गामध्ये उशीरा आल्यावर विद्यार्थ्यांना 1 पाउंट (90 रूपये) प्रती मिनिटाच्या हिशोबाने दंड लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खास गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे पैसे नाहीत व जे रोख रक्कम भरू शकत नाहीत, असे विद्यार्थी 500 पुशअप्स मारून आपली शिक्षा कमी करू शकतात.

टेक्निकल सेंकडरी शाळेची एक ऑडिओ क्लिप लीक झाली आहे. यामध्ये विद्यार्थी सांगत आहेत की, शिक्षक प्रती मिनिटांच्या हिशोबाने दंड घेत आहेत. या ऑडिओ टेपमध्ये एक शिक्षिका हे देखील म्हणत आहे की, आमचे नियम एकदम कठोर आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की, याची मोठी रक्कम द्यावी लागत आहे, तर वेळेत वर्गात या.

शाळेतील काही फोटो देखील समोर आले आहेत. यामध्ये विद्यार्थी पुशअप्स मारताना दिसत आहेत. याविषयी पालकांचे म्हणणे आहे की, हे विद्यार्थ्यांसाठीच चांगले आहे. तर काही पालकांनी विद्यार्थ्यांना या प्रकारे पुशअप्स मारण्यास सांगणे हा शाळेचा मनमानी कारभार आहे.

 

Leave a Comment