आता या देशात जाण्यासाठी लागणार नाही व्हिसा

भारतीय नागरिकांना आता ब्राझीलमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज लागणार नाही. ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी याबाबत घोषणा केली आहे. बोलसोनारो यांनी चीन आणि भारतच्या प्रवाशांना आणि व्यापारासबंधीत लोकांना ब्राझीलमध्ये येण्यासाठी व्हिसाची गरज नसल्याचे म्हटले आहे.

या वर्षीच्या सुरूवातीला ब्राझीलमध्ये सत्तेत आल्यानंतर जेअर बोलसोनारो यांनी अनेक विकसित देशांच्या नागरिकांना ब्राझीलमध्ये येण्यासाठी व्हिसाची गरज नसल्याची घोषणा केली होती.  आता ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारो हे चीनच्या दौऱ्यावर असताना भारत आणि चीन संबंधित व्हिसाची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत पहिल्यांदाच विकसनशील राष्ट्रांसाठी व्हिसाचे नियम बदलण्यात आले आहेत.

या वर्षीच्या सुरूवातीला ब्राझील सरकारने अमेरिका, कॅनेडा, जापान आणि ऑस्ट्रेलियातील नागरिकांसाठी व्हिसाचे नियम बदलले होते. असे असले तरी त्या देशांनी मात्र ब्राझीलसाठी व्हिसाचे नियम बदललेले नाहीत.

 

Leave a Comment