खाजगी डाटा चोरीला गेल्यास इंटरनेट ब्राउजर देणार माहिती

आज जगातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते. या प्लॅटफॉर्मद्वारे शॉपिंगपासून ते पैसे ट्रांसफर करण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र याच प्लॅटफॉर्मद्वारे हॅकर्स युजर्सची माहिती चोरी करतात.

फेसबूक एनालिटिका असेच एक प्रकरण समोर आले होते. ज्यामध्ये लाखो युजर्सचा डाटा लीक झाला होता.

मोंझिला फायरफॉक्सचे नवीन व्हर्जन –

अमेरिकेची टेक कंपनी मोंझिलाने आपल्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये युजर्सचा डाटा सुरक्षित टेवण्यासाठी अनेक खास फीचर्स दिले आहेत. ज्यामध्ये सोशल ट्रेकिंग प्रोटेक्शन, प्रायव्हेसी प्रोटेक्शन आणि पासवर्ड मॅनेजमेंट या फीचर्सचा समावेश आहे. या फीचर्समुळे डाटा चोरी रोखली जाऊ शकते.

कंपनीचे सोशल ट्रेकिंग फीचर युजर्सची माहिती ट्रॅक करण्यापासून रोखेल व ब्लॉक देखील करेल. याशिवाय ट्रॅक करणाऱ्या ट्रॅकर्सची पुर्ण माहिती देखील मिळेल. जर हॅकर्स डाटा हॅक करण्याचा प्रयत्न करत असेल तर पासवर्ड मॅनेजमेंट टूल याची माहिती त्वरित युजर्सला देईल. विंडो आणि मॅक प्लॅटफॉर्मवर मोंझिला फायरफॉक्स 70 चा वापर करता येईल.

गुगलचे पासवर्ड चेकअप टूल –

सर्च इंजिन कंपनी गुगलने युजर्ससाठी क्रोम 78 ब्राउजरमध्ये पासवर्ड चेकअप टूल सपोर्ट दिले आहे.

जर्मन फेडरल फॉर ऑफिस इंफॉर्मेशन सिक्युरिटीने मोंझिला फायरफॉक्स क्रोमपेक्षा अधिक सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. यामध्ये म्हटले आहे की, गुगल क्रोम आणि अन्य ब्राउजर्समध्ये डाटा ट्रॅकिंग थांबवण्यासाठी जास्त फीचर्स नाहीत.

 

Leave a Comment